घरफाळा थकबाकीपोटी 4 व्यावसायिक मिळकती सील.

 घरफाळा थकबाकीपोटी 4 व्यावसायिक मिळकती सील.

----------------------------

कोल्हापूर प्रतिनिधी

शशिकांत कुंभार

----------------------------

ता. 9 :- शहरातील मिळकत कर थकबाकीदारांना घरफाळा विभागामार्फत जप्ती नोटीस लागू करुन देखील काही मिळकतधारकांनी थकीत रक्कम जमा केलेली नाही. त्यामुळे आज घरफाळा विभागीय कार्यालय क्र.2 अंतर्गत जोतिबा रोड परिसरामधील श्री.संत नरहरी सोनार सहकारी पतसंस्था (थकबाकीची रक्कम 6,14,823/-) विभागीय कार्यालय क्र.3 राजारामपूरी अंतर्गत राजारामपूरी 08 वी गल्ली येथील मोहिनी मोहनराव जाधव (थकबाकीची रक्कम 2,61,713/-), मुक्ताबाई म.पौडकर/मोहिनी मोहन जाधव (थकबाकीची रक्कम 70,706/-) व 10 वी गल्ली परिसरातील कडोलीकर (थकबाकीची रक्कम 3,50,489/-) अशा 4 व्यावसायिक मिळकत धारकांची रक्कम रु.12,97,731/- थकीत आहे. त्यामुळे या मिळकतींवर सीलची कारवाई करण्यात आली.


             तरी शहरातील सर्व थकबाकीदारांना पुन:च जाहीर आवाहन करण्यात येते की, ज्यांनी अद्यापही आपला घरफाळ्याची थकीत रक्कम भरणा केलेली नाही. त्यांनी आपला थकीत घरफाळा भरुन महानगरपालिकेस सहकार्य करावे. अन्यथा महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदी नुसार मिळकत सिल किंवा मिळकतीवर बोजा नोंद करण्याची कारवाई करण्यात येईल याची संबंधीतांनी नोंद घ्यावी असे आवाहन महापालिकेच्या घरफाळा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.