ज्ञानज्योती फौंडेशन संचलित सावित्रीबाई जोतिबा फुले वाचनालय खोतवाडी यांच्या अंतर्गत आज दिनांक 5 जानेवारी 2025 रोजी स्वच्छता व वृक्ष संवर्धन मोहीम.

ज्ञानज्योती फौंडेशन संचलित सावित्रीबाई जोतिबा फुले वाचनालय खोतवाडी यांच्या अंतर्गत आज दिनांक 5 जानेवारी 2025 रोजी स्वच्छता व वृक्ष संवर्धन मोहीम.

-----------------------------

पन्हाळा प्रतिनिधी 

 आशिष पाटील 

-----------------------------

*पन्हाळा तालुक्यातील वाघजाई देवस्थान हे जागृत देवस्थान आहे. या वाघजाई देवीची शाकंभरी पौर्णिमा यात्रा जानेवारी महिन्यामध्ये भरते यावर्षीही या देवीची यात्रा 13, 14, 15 जानेवारी या दिवशी भरणार आहे. त्यामुळे यात्रेपूर्वी मंदिर परिसर स्वच्छता करणे खूप गरजेचे होते. वाचनालयाच्या विद्यार्थ्यांनी मंदिर परिसरातील स्वच्छता,31 डिसेंबर नंतर जमा झालेला प्लॅस्टिक कचरा त्याचबरोबर 125 वृक्षांची खुरपणी करून  विहिरीतील पाणी बाहेर काढून त्या वृक्षांना पाणी घातले सकाळी आठ ते दुपारी बारा या वेळेमध्ये श्रमदान करण्यात आले.या श्रमदानामुळे मंदिर परिसर स्वच्छ व सुंदर त्याचबरोबर वृक्ष संवर्धन पूर्ण झाले. या स्वच्छता व वृक्ष संवर्धनाच्या मोहिमेमध्ये J.N. पाटील, संभाजी चौगुले, प्रवीण चोपडे ,वाचनालयाचे 23 विद्यार्थी उपस्थित होते*

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.