AIC पिक विमा कंपनी शेतकऱ्याची करत आहे फसवणूक सन 2023,2024 पिक विमा अजून पर्यंत मिळाला नाही तात्काळ पिक विमा द्या अन्यथा मंत्रालयासमोर मुंबई येथे आंदोलन करण्याचा इशारा.क्रांतिकारी शेतकरी संघटना वाशीम.
AIC पिक विमा कंपनी शेतकऱ्याची करत आहे फसवणूक सन 2023,2024 पिक विमा अजून पर्यंत मिळाला नाही तात्काळ पिक विमा द्या अन्यथा मंत्रालयासमोर मुंबई येथे आंदोलन करण्याचा इशारा.क्रांतिकारी शेतकरी संघटना वाशीम.
---------------------------------
रिसोड प्रतिनिधी
रणजीत सिंह ठाकुर
-----------------------------------
वरील विषयास अनुसरुन निवेदन सादर करण्यात येते की, सन 2024 चा खरीप पिक विमा रॅन्डमली सर्व्हे होवूनही जी 25% अग्रिम रक्कम देण्याची सरकारने ग्वाही दिली होती ती अजुन पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नाही, तसेच दिनांक 21,22,23 व 24 सप्टेंबर 2024 मध्ये वाशिम जिल्हयामध्ये अतिवृष्टी झाली होती त्यामध्ये शेतकऱ्यांचे खुप मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले होते. जशी कंपनी शेतकऱ्याचे पिकाचे नुकसान झाले तर नुकसानीचा क्लेम 72 तासाच्या आत करण्यास सांगते. तसेच दिनांक 21,22,23 सप्टेंबर 2024 ला अतिवृष्टी झाली त्यामध्ये लाखो शेतकऱ्यांनी कंपनी कडे पिक नुकसानीच्या ऑनलाईन तक्रारी दाखल केल्या होत्या. अजुन पर्यंत त्या तक्रारीच्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारची दखल कंपनी कडुन घेण्यात आली नाही. ज्या पध्दतीने कंपनी शेतकऱ्यांना नुकसानीचा क्लेम 72 तासाच्या आत करण्यास सांगते त्याच पध्दतीने कंपनी ने सुध्दा शेतकऱ्यांच्या बांधावर पिक नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी कंपनीचे प्रतिनीधी यायला पाहीजे होते परंतु सध्या रब्बी हंगाम पुर्ण होत आहे तरी सुध्दा कंपनीने पंचनामे केले नाहीत.
तरी महोदय आपल्या माध्यमातुन पिक विमा AIC कंपनी वर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी जेणे करुन शेतकऱ्यांना योग्य तो न्याय मिळेल. अन्यथा क्रांतीकारी शेतकरी संघटना वाशिम यांच्या मार्फत मंत्रालयासमोर तिव्र अंदोलन छेडण्यात येईल.
करीता निवेदन सादर बालाजी मोरे गजुअण्णा पैठणकर, सतीश इढोळे,विशाल गोटे, उत्तमराव मोरे, भारत सोमटकर उपस्थित शेतकरी
Comments
Post a Comment