लोहा तालुक्यातील भाजपा सदस्य नोंदणीच्या जबाबदारी प्रणिताताई देवरे - चिखलीकर यांच्या खांद्यावर.
लोहा तालुक्यातील भाजपा सदस्य नोंदणीच्या जबाबदारी प्रणिताताई देवरे - चिखलीकर यांच्या खांद्यावर.
-------------------------
लोहा प्रतिनिधी
अंबादास पवार
-------------------------
भारतातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून उदयास आलेल्या भारतीय जनता पार्टीच्या सदस्य नोंदणीला प्रारंभ झाला असून लोहा तालुक्यातील भाजपा सदस्य नोंदणीची जबाबदारी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष सौ. प्रनिताताई देवरे - चिखलीकर यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. त्या ही जबाबदारी सार्थपणे पार पाडतील असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त केला जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्रात पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या सदस्य नोंदणीला सुरुवात झाली आहे. ही सदस्य नोंदणी अधिकाधिक करून घेण्याच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीने नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुक्यावर वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त करण्यात आल्या आहेत.लोहा कंधार विधानसभा मतदारसंघातील भाजपा सदस्य नोंदणीची जबाबदारी सक्षम महिला नेतृत्व तथा भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष सौ. प्रणिता ताई देवरे - चिखलीकर यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. सौ. प्रणिता ताई देवरे - चिखलीकर यांनी गेल्या अनेक वर्षांच्या काळात भारतीय जनता पार्टीसाठी दिलेले योगदान , केलेली काम आणि पक्षाला मिळून दिलेली प्रतिष्ठा यामुळे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुन्हा एकदा सौ. प्रणिता ताई देवरे - चिखलीकर यांच्या नेतृत्वावर विश्वास टाकत सदस्य नोंदणीची महत्त्वपूर्ण जबाबदारी दिली आहे . त्यामुळे सौ. प्रानिताताई चिखलीकर यांचे भारतीय जनता पार्टीतून अभिनंदन करण्यात आले असून लोहा कंधार तालुक्यात सर्वाधिक भाजपा सदस्य नोंदणी होईल असा विश्वास आहे व्यक्त करण्यात आला आहे.
Comments
Post a Comment