नियोजन आणि जवाबदारीपूर्वक प्रयत्न हेच यशाचे खरे सूत्र - जिल्हा पोलिस अधीक्षक - अनुज तारे.

 नियोजन आणि जवाबदारीपूर्वक प्रयत्न हेच यशाचे खरे सूत्र - जिल्हा पोलिस अधीक्षक - अनुज तारे.

-----------------------------------

 रिसोड प्रतिनिधी

रणजीत सिंह ठाकुर

-----------------------------------

वाशिम : दि. 28, स्थानिक श्री. रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालय आणि श्री. शिवाजी अध्यापक विद्यालय, वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भविष्यातील यश हे वर्तमानातील तयारीवर अवलंबून असते, त्यामुळे व्यक्तीने नियोजन करून जवाबदारीपूर्वक केलेले प्रयत्न कोणत्याच क्षेत्रात अपयश येऊ देत नाही. असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधिक्षक श्री. अनुज तारे यांनी केले.


यावेळी स्वागत गीताने श्रद्धा मुसळे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध संधींबाबत मार्गदर्शन करणे आणि त्यांना योग्य दिशा देणे हा होता. प्रमुख अतिथी श्री. अनुज तारे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. ‘करियर म्हणजे फक्त स्पर्धा परीक्षा’ नसून करियर या विषयाची व्यापकता त्यांनी स्पष्ट केली. केंद्रीय आणि राज्य लोकसेवा आयोग यांच्या मार्फत घेतल्या जाणाऱ्या नागरी सेवा परीक्षा, विविध क्षेत्रातील स्टार्ट अप, उद्योजगता, सी.एस.आर, संरक्षण क्षेत्र आणि तत्सम क्षेत्रांविषयी विस्तृत माहिती दिली. ध्येयाचा पाठलाग करतांना आपली आवड आणि कौशल्य या आधारित क्षेत्र व विषयांची निवड, समाजमाध्यमांचा योग्य व मर्यादित वापर, चौफेर वाचन हा यशाचा मूलमंत्र त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.


या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड. किरणराव सरनाईक यांनी विद्यार्थ्यांना करियर निवडीमध्ये सहाय्य व्हावे तसेच त्यांना प्रोत्साहन मिळावे हा उद्देश विशद केला तसेच श्री. शिवाजी शिक्षण संस्थेने प्रशासकीय अधिकारी घडविण्यात दिलेल्या योगदानावर प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक यशावर भर न देता सामाजिक जाणिवा निर्माण करण्यावर लक्ष केंद्रीत करावे, असे आवाहन केले.


भारतीय पोलीस दलातील अतुलनीय कामगिरीबद्दल भारत सरकारने श्री. अनुज तारे यांना शौर्य पुरस्काराने सन्मानित केले होते. त्या निमित्ताने श्री. शिवाजी शिक्षण संस्था, वाशीम च्या वतीने त्यांना सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. समाजकार्य महाविद्यालयातील वैष्णवी हारके, पूजा राठोड, वैष्णवी कुकडे, अभय गवळी, कल्याणी धाराशिवकर तसेच जिल्हा युवा पुरस्कार विजेते आकांक्षा गायकवाड, प्रदीप पट्टेबहादूर आणि अध्यापक विद्यालयातील मनिषा ठाकरे, पूनम गावंडे, पूजा मोरे यासर्व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष श्री. अरुण सरनाईक, संचालक डॉ. स्नेहदीप सरनाईक, समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय साळीवकर, अध्यापक विद्यालयाच्या प्राचार्य प्रा. सारिका खुरसडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सृष्टी जाधव व वैष्णवी रणबावळे यांनी केले. प्रास्ताविक प्रा. मंगेश भुताडे आणि आभार प्रदर्शन प्रा. सारिका खुरसडे यांनी केले. कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.