पेडगाव सोनोने कुटुंबाचा स्तुत्य उपक्रम.जुन्या प्रथा-परंपरांना फाटा देत शिक्षणासाठी पैसा खर्च करणार.
पेडगाव सोनोने कुटुंबाचा स्तुत्य उपक्रम.जुन्या प्रथा-परंपरांना फाटा देत शिक्षणासाठी पैसा खर्च करणार.
---------------------------------------
रिसोड प्रतिनिधी.
रणजीत सिंह ठाकुर
---------------------------------------
“शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो प्यायला तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही” हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संदेश आपल्या आयुष्यात उतरवून स्वत:च्या कुटुंबाला आणि समाजाला पुढे घेवून जाणाऱ्या पेडगावच्या सोनोने कुटुंबाने अजून एक स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे.
सोनोने कुटुंबाच्या वतीने दरवर्षी २६ जानेवारीला जिल्हा परिषद शाळा पेडगांव येथील सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले जाते. विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासाव्यतिरिक्त वाचनाची आवड लागावी तसेच थोरा-मोठ्यांमध्ये देखील वाचनसंस्कृती वाढीस लागावी म्हणून ‘एकलव्य’ सार्वजनिक वाचनालय कोणत्याही शासकीय मदतीशिवाय चालवले जाते. विद्यार्थ्यांना अभ्यास करतांना प्रोत्साहन मिळावे आणि त्यांनी जोमाने अभ्यास करावा या उद्देश्याने सोनोने कुटुंबाकडून असे उपक्रम राबवविले जातात.
याच उपक्रमाचा पुढचा टप्पा म्हणून यावर्षी स्व.प्रल्हाद सोनोने यांचे स्मरणार्थ भारत माध्यमिक शाळा चिंचांबापेन इथून इयत्ता १० मध्ये प्रथम आलेल्या गौरव सरनाईक या विद्यार्थ्यास शुभम गणेश सोनोने यांचे हस्ते
Comments
Post a Comment