अंगणवाडी सेविकांचे मानधन वाढी साठी लढा देणा-या राज्य सचिवाचा सत्कार.
अंगणवाडी सेविकांचे मानधन वाढी साठी लढा देणा-या राज्य सचिवाचा सत्कार.
---------------------------------
रिसोड प्रतिनिधि.
रणजितसिह. ठाकुर
---------------------------------
अंगणवाडी सेविकांच्या मानधन वाढीचा लढा सुरूच राहील :राजेश भैया राज्य सचिव.
रिसोड: अंगणवाडी कर्मचारी अगदी तुटपुंज्या मानधावर चोवीस तास आऑन ड्युटी काम करतात .वारवांर अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतिने आंदोलन, संप मोर्चा द्वारे शासनाकडे मान वाढीसाठी मागणी करत असतात. या संघटनेच्या दीर्घ चाललेल्या संपाला दाद देवुन काही अंशी मागण्या शासनानाने मान्य करून मानधनात वाढ केली अंगणवाडी कर्मचारी संघटनेकडून शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करणारे .विविध
मागण्यांची महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ ठाणे रिसोड तालुका अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी मानधन वाढ झाल्याबद्दल आनंद मेळावा आयोजित केला होता आनंद मेळाव्याचे सत्कारमूर्ती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे संघटक सचिव राजेश भैय्या , यांनी सत्कारप्रसंगी सांगितले कि जो पर्यंत अंगणवाडी कर्मचाऱ्याना ,राज्य कर्मचाऱ्याचा दर्जा मिळुन स्केल वेतन श्रेणी मिळणार नाही तो पर्यंत हा लढा सुरूच राहील. एवढ्या मानधनावर आपण समाधानी नाही. जिल्ह्यातील जिल्ह्याच्या अध्यक्ष विजया सांगळे ताई ह्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे देवथळे सर लीला ताई काळे ,प्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मानवरांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला वाशिम जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकला तायडे रिसोड तालुकाध्यक्ष सुलभा पत्की शहरी रिसोड तालुका अध्यक्ष आम्रपाली पठाडे तसेच इतर प्रमुख मंगल काळे आशा चव्हाण शारदा बुरसे झडपे ताई सिंधू रोडगे वर्षा बुंदे रेखा जाधव सुनीता चोपडे कौशल्या फुलसावंगी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शारदा बुरसे तर आभार सुलभा पतकी यांनी मानले
Comments
Post a Comment