डॉ. कुंभार यांच्या पक्ष्यांची दुनिया पुस्तकाला पुरस्कार जाहीर.
डॉ. कुंभार यांच्या पक्ष्यांची दुनिया पुस्तकाला पुरस्कार जाहीर.
---------------------------------
माळशिरस प्रतिनिधी
रणजितदादा गायकवाड
---------------------------------
अकलूज: येथील शिवरत्न शिक्षण संस्थेच्या बीबीए महाविद्यालयातील निवृत्त प्राचार्यव पक्षी अभ्यासक डॉ. अरविंद कुंभार यांनी लिहिलेल्या पक्ष्यांची दुनिया या पुस्तकाला मराठवाड्यातील एकता फौंडेशनच्या राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर झाले आहे. सदर पुरस्कार सतरा जानेवारी रोजी बीड जिल्ह्यातील दहिवडी येथे भरविण्यात येणाऱ्या मराठी साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती एकता फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अनंत कराड यांनी प्रसार माध्यमांना दिली. पुरस्कारचे हे सातवे वर्ष असून रोख रक्कम व स्मृती चिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असल्याची माहिती फौंडेशनचे कोशाध्यक्ष शिवलिंग परळकर यांनी दिली. एकता फौंडेशनचे मार्गदर्शक व मराठवाडा साहित्य परिषद (छत्रपती संभाजीनगर) चे माजी कोषाध्यक्ष तथा ग्रामीण कथाकार डॉ. भास्कर बडे यांच्या अध्यक्षतेखाली परीक्षण समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने डॉ. कुंभार यांनी लिहिलेल्या पक्ष्यांची दुनिया या संशोधनपर पुस्तकास पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे.
डॉ. कुंभार हे अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शंकरराव मोहिते महाविद्यालयात प्राणिशास्त्र विषयाचे अध्यापनाचे काम करून प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त होऊन अकलूजच्याच शिवरत्न शिक्षण संस्था संचलित शिवरत्न इन्स्टिट्यूट आफ मॅनेजमेंट स्टडीज (बीबीए कॉलेज) येथील प्राचार्य पदाचे धुरा संभाळून नुकतेच सेवा निवृत्त झाले आहेत. अकलूजच्या वास्तव्यात त्यांनी निसर्ग भ्रमंती करत पक्ष्यांचा शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास करून 'पक्ष्यांची दुनिया' हे पुस्तक लिहिले आहे. सदर पुस्तकाचे प्रकाशन गतवर्षी सोलापूरात खासदार धैर्यशील मोहिते -पाटील यांच्या हस्ते करण्यात आले होते. सदर पुस्तकाचे क्रमशः वाचन एक नोव्हेंबरपासून सोलापूर आकाशवाणी केंद्रावरून चालू आहे. डॉ. कुंभार हे या पुरस्काराचे सन्मानित होत असल्याने खासदार धैर्यशील मोहिते -पाटील शिक्षण प्रसारक मंडळाचे मार्गदर्शक जयसिंह मोहिते- पाटील, अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील, संचालक कु. स्वरूपाराणी मोहिते -पाटील, शिवरत्न शिक्षण संस्थेचे अध्यक्षा शीतलदेवी मोहिते -पाटील व सचिव धर्मराज दगडे यांनी अभिनंदन केले आहे.
Comments
Post a Comment