वाघाची तालीम कंथेवाडी यांच्या वर्धपन दिना निमित्त भव्य कबड्डी स्पर्धेत अजिंक्यतारा क्रीडा मंडळ प्रथम.
वाघाची तालीम कंथेवाडी यांच्या वर्धपन दिना निमित्त भव्य कबड्डी स्पर्धेत अजिंक्यतारा क्रीडा मंडळ प्रथम.
------------------------------------
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
------------------------------------
वाघाची तालीम कथेवाडी तालुका राधानगरी यांच्या ४ थ्या वर्धापन दिनानिमित्त ५० किलो वजनी गटाच्या भव्य कबड्डी स्पार्धांचे आयोजन आम. शंकर धोंडी पाटील विद्यालयाच्या पटांगणावर करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात तुकाराम कवडे (महाराज) यांचे अध्यक्षतेखाली मा.धीरज करलकर यांच्या हस्ते करण्यात आले
या कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक बक्षीस दहा हजार एक रुपये अजिंक्यतारा क्रिडा मंडळ कंथेवाडी यांनी, द्वितीय क्रमांक बक्षीस 7001 रुपये चे युवा आणाजे, तर तृतीय क्रमांक पाच हजार एक रुपयाचे बक्षीस वाघाची तालीम कंथेवाडी यांनी, जिंकले तर उत्कृष्ट चढाईसाठीचा चषक समर्थ र्हाटवळ यांने मिळविला.
बक्षिस वितरण तालमीचे अध्यक्ष वैष्णव डवर व मंडळाचे पदाधिकारी यांचे हस्ते करण्यात आले यावेळी प्राध्यापक बीके पाटील योगेश पाटील सातापा उर्फ शिवकुमार शंकर पाटील विशाल आनंदा पाटील यांची उपस्थिती होती
या कबड्डी स्पर्धेत बत्तीस संघानी सहभाग घेतला होता. कार्यक्रमाचे निवेदन कपिल पाटील (सर) यांनी केले.
Comments
Post a Comment