गाडगेबाबा त्यागाचे उत्तम उदाहरण : रमेश डुबल.
गाडगेबाबा त्यागाचे उत्तम उदाहरण : रमेश डुबल.
----------------------------------
वाई प्रतिनिधी
कमलेश ढेकाणे
----------------------------------
वाई: राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या माध्यमातून सेवा होते. हे सेवेचे व्रत आहे. समाजसेवेसाठी गाडगेबाबांनी आपले आयुष्य वेचले, गाडगेबाबा हे त्यागाचे उत्तम उदाहरण आहे. असे प्रतिपादन रमेश डुबल यांनी केले
येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसर वीर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या मौजे धावडी येथील विशेष श्रमसंस्कार शिबिरात संत गाडगेबाबा: जीवन व कार्य या प्रबोधनपर विषयावर ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते, धावडी गावचे ग्रामस्थ सोमनाथ मांढरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते याप्रसंगी सरपंच वनिता ननावरे , सदस्य दिप्ती मांढरे, पोलिस पाटील संगीता मांढरे, ग्रामस्थ पुरुषोत्तम मांढरे, महेंद्र गंगावणे, शंतनु मांढरे, समर्थ मांढरे, कार्यक्रम अधिकारी डॉ. संग्राम थोरात, डॉ. अंबादास सकट, दीक्षा मोरे, मेघा शिर्के यांची उपस्थिती होती.
डुबल म्हणाले, मानसिक गुलामगिरी घालवण्यासाठी समाजसुधारक लढले, गाडगेबाबांची वृत्ती विचार होती. त्यांना मानवतेची कणव होती. त्यांनी मानवाबरोबर पशुंवरही प्रेम केले. दारिद्र्य, अज्ञान, बुवाबाजीच्या ते विरुद्ध होते. स्वतःला जिंकल्याशिवाय जग जिंकता येत नाही. गौतम बुद्ध, महात्मा गांधी व गाडगेबाबांनी स्वतःला जिंकले होते. गाडगेबाबांनी हजारो धर्मशाळा बांधल्या पण शाळेत कधीही गेले नाहीत. अनेक संस्था निर्माण केल्या पण स्वतःच्या घरातील कोणालाही त्या संस्थेवर घेतले नाही. लाखो अन्नछत्र चालवले पण स्वतः कधी गोडधोड खाल्ले नाही. देव देवळात नाही तर माणसात आहे हे त्यांचे ब्रीदवाक्य होते. प्रेम, हिंमत व त्याग यांचे उत्तम उदाहरण म्हणजे संत गाडगेबाबा. बुद्धांकडे, गांधींकडे आणि गाडगेबाबांकडे अपार सहनशीलता होती. गाडगेबाबा कीर्तनाच्या माध्यमातून कर्मकांड नको म्हणून सांगत होते. पशुहत्या नको, भूतदया करा, मुलांना शाळेत पाठवा, गरिबांना साहाय्य करा. असे विचार ते मांडायचे. त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून समाज परिवर्तन साधले.
प्रतिक्षा मांढरे यांनीही मनोगत व्यक्त केले.
सोमनाथ मांढरे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून तरुणांनी गाडगेबाबांचे विचार आत्मसात करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सायली बांद्रे, पूजा भाणसे, सायली मांढरे, नंदिनी मांढरे, सानिका सणस, दीक्षा चव्हाण, सानिका जाधव, यश कांबळे व संस्कार सोनवणे यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्वेता शिंदे हीने केले. दीप्ती महांगडे हीने पाहुण्यांचा परिचय करून दिला. श्रुती पवार हिने सूत्रसंचालन केले तर अंजली शेलार हिने आभार मानले.
Comments
Post a Comment