ग्रंथात समाज बदलण्याचे सामर्थ्य – राजेंद्र जायकर.

ग्रंथात समाज बदलण्याचे सामर्थ्य – राजेंद्र जायकर.

--------------------------------------- 

वाई प्रतिनिधी 

कमलेश ढेकाणे 

--------------------------------------- 

वाई: चांगल्या पुस्तकांच्या वाचनाने समाजात बदल घडवून आणता येतो. महात्मा फुले यांनी थॉमस पेन यांच्या साहित्यापासून समाज कार्याची प्रेरणा घेतली आणि समाजजागृत्तीचे कार्य हाती घेतले. महात्मा गांधी यांनी जॉन रस्किन यांच्या साहित्यातून सर्वोदयाची संकल्पना स्वीकारली. कार्ल मार्क्स यांच्या विचारातून लेनिन आणि माओ यांनी प्रेरणा घेतली आणि साम्यवाद जगासमोर आणला. प्रत्येक देशातील वाड्मय हा महत्वाचा ठेवा असतो, तसा तो आपलादेखील आहे. त्यामुळेचं अनेक महान व्यक्तिमत्वे आपल्या देशात निर्माण झाली, अनेक विचारवंतानी प्रचंड कष्ट करून, विरोध पत्करून लेखन केले आहे. त्यांच्या साहित्याचे वाचन करून समाजाला योग्य दिशा देणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. असे प्रतिपादन किसन वीर महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागातील प्राध्यापक राजेंद्र जायकर यांनी केले. 

येथील किसन वीर महाविद्यालयातील जय किसान मुलांचे वसतिगृह, मराठी विभाग, अंतर्गत गुणवत्ता व हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने वाचन संस्कृती वृद्धींगत करण्यासाठी अभिनव उपक्रम “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” अभियानांतर्गत ‘वाचन संस्कृती आणि आजचा युवक’ या विषयावरील विशेष व्याख्यानात ते बोलत होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, बहुआयामी व्यक्तिमत्व घडविण्यासाठी चिकित्सक वाचन करणे आवश्यक आहे. शिवाय आजच्या डिजिटल मिडीयाच्या माध्यमातून वाचन करत असताना सत्यता पडताळून पाहणे अतिशय महत्वाचे आहे. अन्यथा चुकीचे ज्ञान ग्रहण होण्याची शक्यता असते. जीवनानंद घेत असताना वाचन महत्वाची भूमिका पार पाडत असते. ‘आई व्हावी मुलगी माझी, मी व्हावे आईची आई’ यांसारख्या उत्स्फूर्त काव्यपंक्तीचे गायन करून त्यांनी विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले.

डॉ. आनंद घोरपडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, श्री. सोमनाथ सानप यांनी सूत्रसंचालन केले, डॉ. अमोल कवडे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला, वसतिगृहातील विद्यार्थी श्री. कृष्णा राऊत याने उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. वैभव त्रिगुणे, श्री. विनोद कालेकर, गजानन असोले, कु. विनायक भिलारे, कु. अलंका अंभोरे, संध्या कलबुर्गी आदींनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी वसतिगृहामधील विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.