राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम च्या १०० दिवसीय क्षयरोग मोहीमेला कारंजा.खासगी डॉक्टरांचा मोठा सहभाग.
राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम च्या १०० दिवसीय क्षयरोग मोहीमेला कारंजा.खासगी डॉक्टरांचा मोठा सहभाग.
-------------------------
रिसोड प्रतिनिधी
रणजीत सिंह ठाकुर
-------------------------
कारंजा - पंचायत समिती *सभागृहात सभा -CME कार्यक्रम संपन्न.
: दि.30,राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्हा मध्ये चालु असलेल्या 100 दिवसीय क्षयरोग मोहीम अंतर्गत खासगी वैद्यकीय व्यावसायिकांचा सक्रिय सहभाग वाढविण्याबाबत जिल्हाभरात जनजागृती केली जात आहे. या करिता खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांची कार्यशाळा घेण्यात आली.या कार्यक्रमाला डॉक्टर असोशीयेशन (NIMA) व IMA असोसिएशन कारंजा यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पांडुरंग ठोंबरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अनिल कावरखे,जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.यावेळी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.श्री.परभनकर,कारंजा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शंकर नांदे,वैद्यकीय अधिकारी डॉ.राठोड,इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. डोणगावकर, डॉक्टर असोसिएशन अध्यक्ष डॉ.संजय कीटे, केमिस्ट असोसिएशन अध्यक्ष श्री आशिष बंड, वैद्यकीय अधीक्षक डॉ.साळुंखे , आरोग्य विस्तार अधिकारी राजेंद्र मानके, आयुष विभाग डॉ. जॉय चाटसे,जिल्हा कार्यक्रम समन्वयक समाधान लूनसूने,
पि.पि.एस.एय जिल्हा कोऑर्डिनेटर डिगांबर महाजन,मेडिकल असोसिएशनचे महेश राठोड यु.व्ही जाधव,निलेश पाटील, राजेश चव्हाण,रवी बर्वे, कुष्ठरोग पर्यवेक्षक खरतडे, कुष्ठरोग तंत्रज्ञ श्रीकिसन जाधव,पी.पी.एस.ए.क्षेत्रकार्य अधिकारी प्रदिप पट्टेबहादूर,
यांची उपस्थिती.
डॉ. परभणकर यांनी टीबी मुक्त भारत अभियान संदर्भात मार्गदर्शन केले असून देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सर्वांना आवाहन केले आहे की भारत हा 2025 पर्यंत टीबी मुक्त झाला पाहिजे याकरिता आपण सर्वांनी एक संकल्प केला आहे. या संकल्पना साठी सर्वांचे योगदान हे महत्त्वाचा आहे आपण सर्व खाजगी वैद्यकीय सेवेतून देखील या अभियानाला आपले योगदान देऊन सहकार्य करणे हे देशाच्या विकासाला साथ आहे. यांनी टीबी मुक्त व कुष्ठरोग मुक्त भारत अभियान आणि 100 दिवस विशेष मोहिम,BCG लसीकरण,साई टी.बी मार्गदर्शन करून पेशंट संदर्भात येणाऱ्या अडचणी समस्या यावर सविस्तर मार्गदर्शन करून खाजगी डॉक्टर यांच्याकडे येणारे TB संशयित व कुष्ठरोग पेशंट यांचे उपचार समुपदेशन करून टीबी आजार हा उच्चार पूर्ण केल्यास बरा होतो.हा आपण लक्षात आणून देणे गरजेचे आहे. जिल्हा कार्यक्रम समन्वयक समाधान लूनसूने, डीगांबर महाजन, इंडियन मेडिकल असोसिएशन अध्यक्ष डॉ.डोणगावकर, डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय किटे यांनी देखील मार्गदर्शन केले.उपस्थित या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता राजेश चव्हाण नितेश पाटील रवी बर्गे, डिगांबर महाजन,प्रदिप पट्टेबहादूर,
सर्व समुदाय आरोग्य अधिकारी, सर्व नागरी आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी, आयुष सदस्य यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुष्ठरोग पर्यवेक्षक श्री.खरतदे यांनी यांनी केले. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक नितेश पाटील केले. उपस्थित सर्वांचे आभार प्रदिप पट्टेबहादुर यांनी मानले.या वेळी उपस्थित सर्वांना निलेश पाटील यांनी क्षयरोग मुक्तची व श्रीकिसन जाधव शपथ देण्यात आली.
Comments
Post a Comment