राष्ट्रीय युवा दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.
राष्ट्रीय युवा दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.
-------------------------
रिसोड प्रतिनिधी.
रणजीतसिह..ठाकुर
-------------------------
*राजा प्रसेनजीत अल्प.शिक्षण बहु.संस्था व नेहरू मंडळ केकत उमरा यांचा पुढाकार.
रिसोड ; दि.12 जानेवारी 2025, वाशिम जवळच असलेल्या ग्राम केकतउमरा येथील युवा कार्यक्रम एवं खेळ मंत्रालय भारत सरकार नेहरू युवा केंद्र मेरा युवा भारत कार्यालय सलग्निक राजा प्रसेनजीत अल्पसंख्यांक शिक्षण बहुउद्देशीय संस्था व नेहरू युवा बहुउद्देशीय मंडळ केकटतउमरा यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सावित्रीबाई फुले, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेब, स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त 12 जानेवारी ते 19 जानेवारी पर्यंत राष्ट्रीय युवा सप्ताह निमित्त विविध उपक्रमाचे आयोजन 12 जानेवारी पासुन करण्याचा येत असून,तरुण युवक - युवती यांच्या कलागुणांना वाव मिळावी व सामाजिक व शैक्षणिक कार्याची जाणीव जागृती अंगी निर्माण व्हावी सामाजिक उपक्रम यामध्ये वृक्षरोपण,स्वच्छता अभियान,जलजागृती कॅच द रेन,वाचन संकल्प, चित्रकला स्पर्धा,निबंध स्पर्धा,वेशभूषा स्पर्धा,वकृत्व स्पर्धा,अंधश्रद्धा निर्मूलन,कायदेविषयक विषयक मार्गदर्शन,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, क्रीडा स्पर्धा,महिला जागरूकता,मासिक पाळी व महिला सक्षमीकरण,या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती यावेळी राजा प्रसेनजीत अल्पसंख्यांक शिक्षण बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष प्रविण पट्टेबहादूर व नेहरू युवा बहुउद्देशीम मंडळाचे अध्यक्ष प्रदिप पट्टेबहादुर यांनी दिली आहे.
Comments
Post a Comment