मराठी राज्य पत्रकार संघाच्या वतीने नूतन आमदार राजेश क्षीरसागर यांचा सत्कार.

 मराठी राज्य पत्रकार संघाच्या वतीने नूतन आमदार राजेश क्षीरसागर यांचा सत्कार.

------------------------------------ 

कोल्हापूर प्रतिनिधी 

विजय बकरे

------------------------------------ 

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाचे नूतन आमदारआणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचा सत्कार करण्यात आला. शिवसेनेचे कोल्हापूरचे मुख्यालय असलेल्या शिवालय या कार्यालयात हा कार्यक्रम झाला. यावेळी मराठी राज्य पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष धीरज रुकडे, जिल्हा सचिव नवाब शेख आणि जिल्हा संघटक विनोद नाझरे यांच्या हस्ते आमदार क्षीरसागर यांना महालक्ष्मी प्रतिमा आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी मराठी राज्य पत्रकार संघटनेच्या आगामी जिल्हा अधिवेशनासाठी सक्रिय मदत करण्याचे आश्वासन आमदार क्षीरसागर यांनी पत्रकार संघटनेच्या शिष्टमंडळास दिले. संघटनेचे पदाधिकारी इंद्रजित मराठे आणि सौ. सायली मराठे यांचा सात वर्षीय चिरंजीव साम्राज्य मराठे याने पुणे जिल्ह्यातील अतिदुर्गम लिंगाणा किल्ला सर केल्याबद्दल आमदार क्षीरसागर यांनी त्याचे कौतुक केले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी  विजय बकरे,सागर शेरखाने,रोहन भिऊगडे, रोहित घोरपडे, इंद्रजित मराठे, सौ सायली मराठे उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.