किसन वीर’ च्या स्वयंसेवकांनी घेतली शस्त्रांची माहिती,रेझिंग डे निमित्त वाई पोलिस ठाण्यास भेट.

 ‘किसन वीर’ च्या स्वयंसेवकांनी घेतली शस्त्रांची माहिती,रेझिंग डे निमित्त वाई पोलिस ठाण्यास भेट.

---------------------------------- 

वाई प्रतिनिधी 

कमलेश ढेकाणे 

---------------------------------- 

वाई : दि. ११ डिसेंबर

येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवकांनी रेझिंग डे निमित्त वाई पोलिस ठाण्यास भेट देऊन विविध शस्त्रांची माहिती घेतली. प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे यांच्या मार्गदर्शनाखाली व कॅप्टन डॉ. समीर पवार यांच्या सहकार्याने कार्यक्रम अधिकारी  डॉ. संग्राम थोरात व डॉ. अंबादास सकट यांनी याचे नियोजन केले.

शासनाच्या वतीने जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात दोन जानेवारी हा महाराष्ट्र राज्य पोलिस उन्नत दिन म्हणून साजरा केला जातो. या सप्ताहानिमित्त पोलिस ठाण्यातील काम कसे चालते, जनतेच्या सुरक्षेसाठी  वाहतुकीचे नियम काय आहेत, तरुणांनी प्रलोभनांना बळी पडून गुन्हेगारीकडे वळू नये अशी मौलिक माहिती दिली.

पोलिस कर्मचारी मंगेश जाधव यांनी वेगवेगळ्या शस्त्रांची माहिती दिली. चित्रपटांमुळे लोकांमध्ये असणारे बंदुकीपासुन रायफल पर्यंतचे गैरसमज त्यांनी दूर केले. बंदुकीच्या गोळ्या, दारूगोळा, बेडी, बॉंब यांची माहिती देऊन त्यांनी रायफल कशी हाताळली जाते व  शस्त्रांची कार्यक्षमता यांचे प्रात्यक्षिक दाखवले.

मोबाईल मध्ये अडकलेल्या तरुणांनी पोलिसांच्या शौर्याची माहिती घ्यावी. मुंबईतील ताज हॉटेल वरील दहशतवादी हल्ल्यात पोलिसांनी केलेला पराक्रम व त्यावेळी त्यांनी स्वतः गाजविलेले शौर्य त्यांनी अभिमानाने सांगितले. पोलिस हाही एक माणूसच आहे, त्याला समाजाच्या सहकार्याची गरज असते असे त्यांनी सांगितले. तसेच स्वयंसेवकांच्या विविध प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे दिली.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.