इचलकरंजी तील यंत्रमाग कामगार किती दिवस मालकाच्या गुलामीत राहणार? जिल्हाध्यक्ष भरमा कांबळे.
इचलकरंजी तील यंत्रमाग कामगार किती दिवस मालकाच्या गुलामीत राहणार? जिल्हाध्यक्ष भरमा कांबळे.
-------------------------------
कुंभोज प्रतिनिधी
विनोद शिंगे
-------------------------------
यंत्रमाग कामगारांना 2017 पासून कोणतीही पगारवाढ / मजुरीवाढ मिळाली नाही, राज्यातील भाजप सरकार आणि केंद्रातील भाजप सरकार यंत्रमाग कामगारांच्या गुलामगिरीत वाढच करीत आहे, गेली 9 वर्षे येथील मालक कामगारांचेकडून 12 तास 12 माग 14 माग चालवून 10 ते 12 हजार रुपयात कामगारांकडून काम करवून घेत आहेत, या कामगारांची अवस्था प्रचंड खचलेली आहे, एका बाजूला कामाचा प्रचंड ताण आणि दुसऱ्या बाजूला वाढणारी महागाई, त्यातच मुलांच्या शिक्षणाची आबाळ याची जरासुद्धा दया या गावातील मालकांना येत नाही, म्हणून आत्ता कामगार उठला तरच मालकाला जाग येणार आहे नाहीतर उद्याच्या काळात इचलकरंजीची भिवंडी झाल्याशिवाय राहणार नाही.
2013 मध्ये येथील कामगारांना 28.5 पैसे मजुरीवाढ मिळाली होती त्याकरिता कामगारांना 41 दिवसाचा संप करावा लागला होता, त्यावेळी आजी आमदार आणि माजी आमदार यांच्या मध्ये कामगारांना मजुरीवाढ देणेसाठी स्पर्धा लागली होती, मात्र गेली 6 वर्षे दोघे एकत्र नांदत असल्यामुळे कामगारांच्या प्रश्नाकडे कोणाचेही लक्ष नाही, युनियन वाले वर्षातून एक महिना यासाठी पाठपुरावा करतात मात्र त्यांना मालक - कामगार खाते आणि स्वतः कामगार साथ देत नसल्याने हे गुऱ्हाळ गेली 9 वर्षे पेटतच नाही,गेल्या आठ वर्षात 16 वेळा महागाई भत्ता वाढला, 2017 साली 1566 रुपये वरून आज 6496 रुपये झाला आहे, मात्र या वाढीपैकी एक रुपये सुद्धा मालकांनी यंत्रमाग कामगारांना दिलेला नाही, 2013 साली 250 रुपये मूळ पगार आणि 5649 रुपये महागाई भत्ता असे एकूण 5899 रुपये किमान वेतन होते, 2015 साली किमान वेतन कायद्याची फेर रचना झाली आणि 9500 मूळ पगार आणि 1218 रुपये महागाई भत्ता असे झाले, त्याचे रूपांतर आज मूळ पगार 10100 आणि महागाई भत्ता 6496 इतके झाले आहे. मात्र मालकांच्या हुशार आणि कामगार विरोधी नेत्यांनी आम्ही मजुरी वाढीच्या करारातून बाहेर पडत असल्याचे जाहीर करून लोकशाहीला हरताळ फसला आहे.
आज यंत्रमाग आणि ऑटो लुम कामगाराला दररोज 8 तास कामाला 638 रुपये पगार मिळाला पाहिजे, तर यंत्रमाग कामगारांना पीस रेट चा विचार केला तर 52 पीक एक मीटर कापडाला 11
पैसे मजुरी मिळाली पाहिजे, आणि गेल्या आठ वर्षाचा हिशोब केलेस आज 52 पीक एक मीटर कापडाला 1 रुपये 75 पैसे मजुरी मिळाली पाहिजे. ऑगस्ट 2024 मध्ये महाराष्ट्र शासनाने किमान वेतनाची फेररचना करण्यासाठी हरकती सूचना मागवल्या होत्या त्यामध्ये हे किमान वेतन 19000 रुपये पेक्षा जास्त असावे अशी घोषणा केली आहे, त्याचा विचार करता कामगारांचे एका दिवसाचे वेतन 730 रुपये होणार आहे.
या सर्व परिस्थितीचा विचार करता आत्ता कामगारांनी शेंडी तुटो की पारंबी लोकसभा गेली, तिथे मोदी आणि भाजपच आले, विधानसभा गेली तिथे फडणवीस आणि भाजपच आले, मात्र कामगारांच्यासाठी या आमदार आणि खासदारांनी काहीच केले नाही, निवडणुकीपूर्ती खाण्यापिण्याची सोय केली मात्र कामगारांना कायम स्वरूपी जगण्यासाठी त्यांना कल्याणकारी मंडळ, किमानवेतन, आणि तात्पुरती मजुरीवाढ यापैकी काहीच केलेले नाही, म्हणून आपल्या प्रश्नासाठी आपणच पुढाकार घ्यावा लागेल याची तयारी करावी असे आवाहन लाल बावटा युनियन चे जनरल सेक्रेटरी कॉ. भरमा कांबळे यांनी केले आहे
Comments
Post a Comment