श्री.वसंतराव नाईक महविद्यालयच्या विशेष श्रमसंस्कार शिबीरात श्री पंकजपाल महाराज यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम संपन्न.
श्री.वसंतराव नाईक महविद्यालयच्या विशेष श्रमसंस्कार शिबीरात श्री पंकजपाल महाराज यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम संपन्न.
-----------------------------------
रिसोड प्रतिनिधी
रणजीत सिंह ठाकुर
-----------------------------------
*मंगरूळपिर :-* स्थानिक श्री. वसंतराव नाईक कला व श्री.अमरसिंग नाईक वाणिज्य महाविद्यालय मंगरुळपीर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष मा.आ.अ. राठोड साहेब व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एम.वडगुले यांच्या मार्गदर्शना खाली रासेयो विशेष श्रमसंस्कार शिबीर दि. 25 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत दत्तक ग्राम चेहेल येथे संपन्न झाले.
या प्रसंगी शिबिरांतर्गत सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून विदर्भातील सुप्रसिद्ध समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराजांचे शिष्य श्री पंकजपाल महाराज यांचा समाज प्रबोधन कार्यक्रम दिनांक 29 डिसेंबर रोजी संपन्न झाला.या कार्यक्रमाचे प्रस्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.पी.आर.तायडे यांनी केले. श्री पंकज पाल महाराजांनी सर्व शिबिरार्थी व गावातील सर्व ग्रामस्थांना अंधश्रद्धा कर्मकांड बुवाबाजी स्वच्छता निर्मल ग्राम हुंडाबळी स्त्रीभ्रूणहत्या बालविवाह बालगुन्हेगारी व्यसनमुक्ती आणि आजच्या शैक्षणिक वातावरणावर सखोल असे प्रबोधनातून मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला जवळपास 900 ते 1000 ग्रामस्थांची उपस्थिती लाभली हा कार्यक्रम रासियो कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉक्टर पी आर तायडे यांच्या नेतृत्वात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ.पी. आर.तायडे यांनी केले.या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ.दत्तात्रय चौधरी अध्यक्ष गणपती संस्थान चेहेल, विनोद भाऊ चौधरी अध्यक्ष तंटामुक्ती समिती, सुनील भाऊ चौधरी पोलीस पाटील चेहेल, विनोद भाऊ राठोड प्रतिष्ठित नागरिक या प्रमुख अतिथीची उपस्थिती लाभली.
Comments
Post a Comment