जनता शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड.

जनता शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड.

--------------------------------- 

वाई प्रतिनिधी 

कमलेश ढेकाणे 

---------------------------------- 

वाई : येथील जनता शिक्षण संस्थेच्या विश्वस्त कार्यकारी मंडळाची व पदाधिकाऱ्यांची पुढील पाच वर्षासाठी बिनविरोध निवड करण्यात आली. विश्वस्त कार्यकारी मंडळाची मुदत संपल्याने नवीन मंडळाची व पदाधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी दि. ३० जानेवारी २०२५ रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली असून सभेत संस्थेच्या एकूण २९ सदस्यांपैकी २४ सदस्य उपस्थित होते. विश्वस्त कार्यकारी मंडळावर श्री. मदन भोसले, श्री. शंकरराव गाढवे, डॉ. जयवंत चौधरी, प्रा. नारायण चौधरी, श्री. केशवराव जाधव (पाडळे), श्री. सुरेश यादव, श्री. मिलिंद पाटील (जाधव), सीए उदयभाई गुजर, श्री. प्रवीण जगताप, श्री. सुनील शिंदे, व पदसिद्ध सदस्य प्राचार्य डॉ. गुरूनाथ फगरे यांची निवड झाली.

या सभेनंतर पदाधिकारी निवडीसाठी नवीन विश्वस्त कार्यकारी मंडळाची सभा झाली. या सभेत अध्यक्ष - श्री. मदन भोसले, उपाध्यक्ष - श्री. शंकरराव गाढवे, सचिव - डॉ. जयवंत चौधरी, खजिनदार - प्रा. नारायण चौधरी या पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

सभा समारोपावेळी अध्यक्ष मदन भोसले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, किसन वीर महाविद्यालयाने शैक्षणिक गुणवत्तेत नेहमीच अग्रगण्य राहण्याचा प्रयत्न केला आहे. तोच प्रयत्न अधिक गतीने बळकट करण्यासाठी या ठिकाणी विविध शैक्षणिक कोर्सेस सुरू करण्यात येतील. त्यातून गुणवंत, ज्ञानवंत आणि सक्षम विद्यार्थी घडतील, असा विश्वास मला वाटतो.

कार्यकारी मंडळाच्या सर्व सदस्यांनी पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले व त्यांना संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.