प्रवासाचे अतिरिक्त भाडे देऊनही प्रवाशांना करावा लागतो मानसिक त्रास सहन रिसोड आगाराची शिवशाही बस नादुरुस्त.
प्रवासाचे अतिरिक्त भाडे देऊनही प्रवाशांना करावा लागतो मानसिक त्रास सहन रिसोड आगाराची शिवशाही बस नादुरुस्त.
-----------------------------------
रिसोड. प्रतिनिधी
रणजितसिह. ठाकूर
-----------------------------------
. रिसोड एसटी आगाराची शिवशाही बस जालना ते संभाजीनगर यादरम्यान नादुरुस्त होऊन प्रवाशांना मानसिक त्रास सहन करण्याची घटना 7 जानेवारीच्या सकाळी 10 वाजता घडली.मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार, रिसोड आगाराची शिवशाही ही वातानुकूलित बस रिसोड ते छत्रपती संभाजीनगर बस क्रमांक एमएच 09 ईएम 2118 ही बस जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान नादुरुस्त झाल्याने अतिरिक्त भाडे देऊ नये परवाशांना मानसिक त्रास सहन करावा लागला आहे.विशेष म्हणजे या वातानुकूलित असलेल्या शिवशाही बस मध्ये लहान मुलास महिला वयोवृद्ध नागरिक तसेच शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी प्रवास करीत होते.जालना ते छत्रपती संभाजी नगर दरम्यान अचानक बस नादुरुस्त झाल्याने एसटीच्या चालकाने सर्व प्रवाशांना दुसऱ्या बस मध्ये बसवून मार्गस्थ केले.त्यामुळे बसमधील प्रवाशांना आपले सामान व लहान मुलांना घेऊन दुसऱ्या बसमध्ये बसताना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला आहे.रिसोड एसटी आगार हे एसटी आगाराचे भंगार झाले असून एसटी डेपोत अनेक नादुरुस्त बसेस धुळखात पडलेल्या आहेत.रिसोड एसटी आगारात अनेक बसेस नादुरुस्त असूनही आगार व्यवस्थापकाच्या दुर्लक्षामुळे रिसोड एसटी आगाराची बस लांब पडल्याच्या मार्गावर असतानाही मधातच नादुरुस्त होत असल्याने नेहमीच्या भाड्यापेक्षा अतिरिक्त भाडे देऊनही वातानुकूलित शिवशाही ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना शिवशाही नादुरुस्त झाल्याने मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.वास्तविक पाहता कोणत्याही एसटी आगारातून बस लांब पल्ल्याच्या मार्गावर सोडताना आगार व्यवस्थापक चालक तसेच एसटी दुरुस्त करणाऱ्या मेकॅनिकलने गाडीची सर्व शहानिशा करूनच लांब पल्ल्याच्या मार्गावर गाडी सोडावी असे प्रवाशांचे मत आहे.परंतु रिसोड एसटी आगार व्यवस्थापकाचे या गंभीर बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असून चालक वाहक एसटी बाहेर काढताना कोणत्याही प्रकारची एसटीची दुरुस्ती बाबत शहानिशा न करता लांब पल्ल्याच्या मार्गावर सोडतात त्यामुळे वातानुकूलित असलेल्या शिवशाही बसेस रस्त्यातच नादुरुस्त होऊन प्रवाशी महिलांना तसेच वयोवृद्धासह शालेय विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.या गंभीर बाबीकडे रिसोडे आगाराचे व्यवस्थापक तसेच चालकांनी लक्ष देऊन प्रवाशांना होणारा त्रास टाळावा अशी मागणी प्रवासी वर्ग करीत आहे. मी सकाळी सहा वाजता रिसोड आकाराच्या रिसोड ते छत्रपती संभाजीनगर या शिवशाहीने प्रवास करीत असताना जालना ते छत्रपती संभाजी नगर दरम्यान शिवशाही बस अचानक बंद पडल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली.( यावेळी बस मध्ये वयोवृद्ध, महिला लहान मुलं व शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी होत्या. शिवशाही बस नादुरुस्त झाल्याने पुढचा प्रवास कसा करायचा हा प्रश्न निर्माण झाला. तेवढ्यात पाठीमागून येणाऱ्या बस मध्ये शिवशाहीच्या चालकाने नादुरुस्त झालेल्या शिवशाही बस मधील सर्व प्रवाशांना त्या बस मध्ये बसवून पुढील प्रवासासाठी मार्गस्थ केले. वास्तविक पाहता साध्या बस पेक्षा शिवशाही या वातानुकूलित बच्चे प्रवासाचे भाडे हे अतिरिक्त आहे त्यामुळे अतिरिक्त भाडे देऊनही शिवशाही बसेस रस्त्यातच बंद पडून प्रवाशांना त्रास सहन करावा लागत असेल तर अतिरिक्त भाडे द्यायचे कशासाठी हा प्रश्न निर्माण होत आहे. ) केशव गरकळ, प्रवासी रिसोड
Comments
Post a Comment