वन्य प्राण्यांनी हरभरा पीक केले जमीन दोस्त वन विभागाने बंदोबस्त करण्याची मागणी... बालाजी मोरे.
वन्य प्राण्यांनी हरभरा पीक केले जमीन दोस्त वन विभागाने बंदोबस्त करण्याची मागणी... बालाजी मोरे.
-------------------------------------
रिसोड, प्रतिनिधी
रणजीत सिंह ठाकुर.
-------------------------------------
तालुक्यातील घोटा येथील शेतातील हरभरा पीक रोही या वन्य प्राण्यांनी जमीन दोस्त केले असल्याने शेतकऱ्याचे हजारो रूपयांचे नुकसान झाले आहे. रानडुक्कर हा प्राणी खाण्यापेक्षा पिकाची नासाडी जास्त करत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रंदिवस कष्ट करून आलेल्या पीकाची अशी नासाडी होत असेल तर शेतकऱ्यांनी जगावे कसे? असे प्रश्न शेतकऱ्यासमोर निर्माण होत आहेत. तरी वन विभागाने या प्राण्याचा कायमचा बंदोबस्त करावा अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते बालाजी मोरे यांनी केली आहे. रिसोड तालुक्यात
मागील काही महिन्यापासून वन्य प्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली असून रोही, हरिण, रानडुकरे, माकडे यांच्या त्रासामुळे शेतकरी हैराण झाले आहेत असून
मेटाकुटीस आले आहे.
वन विभागांनी या प्राण्याचा बंदोबस्त करावा व नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटना वाशिम,बालाजी मोरे, व शेतकरी वर्गातून केल्या जात आहे. परंतु शेतकऱ्यांना
वन विभागाकडून मिळणारी मदतही तुटपोजी मिळत असते त्याचा काही फायदा होत नाही उलट नुकसानच झालेले जास्त असते त्यामुळे हे नामधारी मदत करणे शासनाने सोडून द्यावे त्यापेक्षा जे वन्य प्राणी आहेत जेथे वन विभागाचा संपूर्णता भाग आहे व अशा ठिकाणी तारेचे कुंपण असतात अशा मोठ्या जंगलात नेऊन हे वन्य प्राणी सोडावेत अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
तालुक्यातील घोटा या गावांमध्ये वन्य प्राण्यांनी अक्षरशः हैदोस घातला आहे.
Comments
Post a Comment