रिसोड येथे अंगणवाडीचा आरंभ पालक मेळावा.
रिसोड येथे अंगणवाडीचा आरंभ पालक मेळावा.
------------------------------
रिसोड प्रतिनिधी
रणजीत सिंह ठाकुर
------------------------------
रिसोड: रिसोड शहरात बालविकास नागरी प्रकल्प अकोला वाशिम अंतर्गत शहरातील पंधरा अंगणवाडी मिळुन सावित्रीबाई फुले विद्यालय येथे आरंभ पालक मेळावा घेण्यात आला .या मेळाव्याचा उद्देश हाच कि पालकांना बालसंगोपनाच्या विविध घटकाबदल माहिती देणे पालकांना बालविकासाविषयी करण्यासाठी सोदाहरण माहिती देण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सावित्रीबाई फुले विद्यालयाचे मुख्याध्यापक नारायण मोरे, प्रमुख असद खान सर मुख्याध्यापक, शालिग्राम पठाडे सर, प्रमुख मार्गदर्शिका मुख्य सेविका शुभांगी शिंदे मॅडम होत्या. प्रथम मान्यवरांच्या हस्ते माता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमानां पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या मेळाव्यात पंधरा अंगणवाडीचे पंधरा स्टाॅल लावले होते. त्या स्टाॅल मधुन विविध प्रकारची बालसंगोपन विषयी माहिती अंगणवाडी सेविका देत होती.जसे कि भविष्याचे झाड, मेंदुचे जाळे या मध्ये बाद न होण्याचे बाद होण्याचे खेळ,झुंबर व खुळखुळा ,भरणीत बाॅल टाकणे व काढणे,आरसा खेळ, तोंडात घास, घरगुती वाद्य वाजविणे ,ठसे काम ,आहार प्रत्यक्षिक, आहार प्रदर्शनी, टिकली लावणे, सोशल मिडिया,सुरक्षित वातावरण, खेळ घर, अशा विविध प्रकारांने बालकांचे संगोपन केल्यास बालक निर्भय व विकसीत होऊ शकते,
या कार्यक्रमाचे प्रास्ताविकात शिंदे मॅडम नी या मेळाव्यामधुन जे दाखविले जात आहे. तशाच पद्धतीने पालकांनी आपल्या बालकांवर संस्कार टाकावे,,घडवावे.
असीत खान सर यांनी खंत व्यक्त केली अंगण वाडी सेविका आपल्याला सेवा देतात, सर्व नोंदी करतात पण आपण त्यांना प्रतिसाद देयाला पाहिजे बालकंच्या जन्म नोंदी प्रधान्याने करुन आपल्या पाल्याची नोंद ही अचुक करावी नसता पुढे खुप अडचणी येतात, कार्यक्रमाचे अध्यक्ष मोरे यांनी या उपक्रमाविषयी कौतुक केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रंजना डोंगरे .व आभार वैष्णवी कोटकर नी मानले. या मेळाव्यासाठी मालेगाव येथील सेविका इंगळे ताई व इतर तीघी,या मेळाव्यात महिला पालक बहुसंख्येने उपस्थित होत्या. हा मेळावा यशस्वी करण्या साठी
सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस, यांनी परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment