चौंडेश्वरी मातेला साठ भाज्यांचा नैवेद्य दाखवून पौष पौर्णिमा उत्सवाची सांगता.
चौंडेश्वरी मातेला साठ भाज्यांचा नैवेद्य दाखवून पौष पौर्णिमा उत्सवाची सांगता.
------------------------------------
करकंब प्रतिनिधी
------------------------------------
प्रतिवर्षाप्रमाणे श्री चौंडेश्वरी पौष पौर्णिमा निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या अखंड सात दिवस नारदीय कीर्तन सप्ताह आणि महिलांच्या विविध स्पर्धा झाल्यानंतर पौष पौर्णिमा दिवशी करकंब समस्त कोष्टी समाज बांधव व महिलांच्या उपस्थितीत श्री चौंडेश्वरी मातेची पालखी मिरवणूकीने पौष पौर्णिमा उत्सवाची सांगता झाली.सकाळी पहाटेपासून चौंडेश्वरी मातेची ब्राह्मण वृदांच्या मंत्रघोषात अभिषेक संपन्न झाला त्यानंतर दुपारी साठ भाज्यांची आरास पूजा संजीवकुमार म्हेत्रे परिवाराच्या वतीने करुन समाजबांधवांच्या उपस्थितीत महाआरती करुन करकंब गावच्या नगरप्रदक्षिणेला सुरुवात झाली.म्हसोबा बसस्टँड वर आरती करून नंतर शुक्रवार पेठ कसबा पेठ सोमवार पेठेतून पालखी चौंडेश्वरी मंदिरात विसावली.त्यानंतर अभिराज दत्तात्रय लोटके परिवाराच्या वतीने सर्व समाजबांधवांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आणि पौष पौर्णिमा महोत्सवाची दिमाखात सांगता झाली.संपूर्ण महोत्सव यशस्वी करण्यासाठी श्री चौंडेश्वरी मंदिर ट्रस्टचे सर्व पदाधिकारी आणि समस्त कोष्टी समाज बांधव आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या*
Comments
Post a Comment