महिती अधिकार कार्यकर्ता महासंघ रिसोड तालुका उपप्रचारक पदी पत्रकार अमर कानडे यांची नियुक्ती.
महिती अधिकार कार्यकर्ता महासंघ रिसोड तालुका उपप्रचारक पदी पत्रकार अमर कानडे यांची नियुक्ती.
-----------------------------------
रिसोड प्रतिनिधी
रणजीतसिह ठाकूर
-----------------------------------
माहिती अधिकार कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी रिसोड तालुक्यात उपप्रचारक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. या पदासाठी पत्रकार अमर कानडे यांची निवड करण्यात आली आहे. पत्रकार अमर कानडे हे सामाजिक कार्यात सक्रिय असून, माहिती अधिकार कायद्याबाबत जनजागृतीसाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे तालुक्यात माहिती अधिकाराच्या अंमलबजावणीत अधिक पारदर्शकता येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. माहिती अधिकार कायदा (RTI) हा 2005 मध्ये भारतात लागू झाला आणि त्यामागचा उद्देश नागरिकांना सरकारी माहिती सहजपणे उपलब्ध करून देणे हा होता. मात्र, अलीकडच्या काळात या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत अनेक तक्रारी आणि अडचणी समोर येत आहेत. नागरिकांनी केलेल्या RTI अर्जांना वेळेत उत्तर मिळत नाही, काहीवेळा अपूर्ण किंवा चुकीची माहिती दिली जाते, तर अनेक प्रकरणांमध्ये सरकारी यंत्रणा अर्जदारांकडे दुर्लक्ष करतात. यामुळे माहितीच्या अधिकाराचा मूळ उद्देश सफल होताना दिसत नाही.
माहिती अधिकार कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि नागरिकांना त्यांच्या अधिकारांबाबत अधिक सजग करण्यासाठी राज्यात महिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन स्थापन करण्यात आली या संघटनेचा उद्देश माहिती अधिकार कायद्याचा अधिकाधिक वापर करून शासकीय कामकाजात पारदर्शकता आणणे, तसेच भ्रष्टाचाराला आळा घालणे हा आहे.
संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांच्या उपस्थितीमध्ये महासंघाचे रिसोड तालुका उपप्रचारक पद अमर कानडे यांनी स्वीकारले असून, त्यांनी माहिती अधिकार कायद्याच्या महत्त्वाबाबत जनजागृती करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. महासंघाचे विविध सामाजिक कार्यकर्ते, माहिती अधिकार कार्यकर्ते, वकील, पत्रकार आणि नागरिक उपस्थित होते.
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ आर.टी.आय कार्यकर्त्याची राज्यव्यापी एकजूट संघटना ही नागरिकांना त्यांच्या हक्कांसाठी लढण्यासाठी एक महत्त्वाचा मंच ठरेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
*अमर कानडे म्हणाले "माहिती अधिकार कायद्यामुळे सामान्य नागरिकांना सरकारच्या कामकाजाबाबत माहिती मिळवण्याचा अधिकार मिळाला आहे. परंतु अनेक वेळा ही माहिती वेळेत मिळत नाही किंवा चुकीची दिली जाते. अशा स्थितीत नागरिकांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांची जपणूक करण्यासाठी ही महिती अधिकार कार्यकर्ता महासंघ उपयुक्त ठरेल."*
*महासंघाचे मुख्य उद्दिष्ट माहिती अधिकार कायद्याच्या मदतीने विविध सरकारी विभागांत पारदर्शकता आणणे, नागरिकांना कायद्याच्या उपयोगाबाबत प्रशिक्षण देणे, तसेच माहिती अधिकाराच्या गैरवापराबाबत जनजागृती करणे हे आहे. महासंघाचे माध्यमातून नागरिकांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे व योग्य मार्गदर्शन मिळवण्यास मदत करेण.*
*अमर कानडे रिसोड तालुका उपप्रचारक { महिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र }
Comments
Post a Comment