भारत प्राथमिक मराठी शाळेत पतंगोत्सव साजरा.

 भारत प्राथमिक मराठी शाळेत पतंगोत्सव साजरा.

-----------------------------------

रिसोड प्रतिनिधी

 रणजितसिह. ठाकुर     

-----------------------------------

रिसोड : येथील भारत प्राथमिक मराठी शाळेत मकरसंक्रातीच्या पर्वावर पतंग उत्सव साजरा करण्यात आला.  विद्यार्थ्यांनी  शाळेच्या क्रीडांगणावर सकाळच्या आल्हाददायी  वातावरणात तिळगुळ वाटप करून रंगबेरंगी पतंग उडवत पतंगबाजीचा आनंद लुटला. मकरसंक्राती  हा स्नेह वृद्धिंगत करणारा सण संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. भारतीय संस्कृतीची माहिती मुलांना व्हावी ह्या हेतूने  शाळेच्या मुख्याध्यापिका किरणताई दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर उपक्रमाचे  आयोजन करण्यात आले.

पतंग महोत्सवाला सुरुवात करण्यापूर्वी मुख्याध्यापिका किरणताई दुबे  यांनी मुलांना मकरसंक्रांतीच्या सणाविषयी माहिती दिली.  ह्या सणाला सांस्कृतिक तसेच शास्त्रीय महत्व सुद्धा असल्याचे  सांगितले. मुलांनी या वेळी पतंग उडविण्याचा मनमुराद आनंद घेतला. सदर उपक्रमाच्या यशस्वीतेकरिता ज्येष्ठ शिक्षिका ज्योतीताई दुबे, पूजा लोंढे, पूनम कारंजकर,संगीता दुपारते, सुनीता रासकर , संगीता गोरटे, शिक्षक प्रवीण देशमुख यांनी  सहकार्य केले.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.