उत्पन्नाचे दाखले लवकर देण्याची निवेदनाद्वारे मागणी.
उत्पन्नाचे दाखले लवकर देण्याची निवेदनाद्वारे मागणी.
-------------------------------
रिसोड प्रतिनिधी
रणजीत सिंह ठाकुर
-------------------------------
नागरिकांना विविध योजनेसाठी लागणारे उत्पन्नाच्या दाखल्यासाठी प्रशासन स्तराकडून खूप उशीर होत असल्याने नागरिकांना वाट बघावी लागते. यामुळे उत्पन्नाचे दाखले हे कमी वेळेत व लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावे अशी मागणी माजी नगरसेवक फयाज अहमद यांनी दिनांक 15 जानेवारी रोजी तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शासनाच्या विविध योजना करिता, व घरकुल करिता उत्पन्नाचा दाखला लागत आहे पूर्वी तलाठी अहवाल घेऊन सेतू केंद्र वाले एक किंवा दोन दिवसात उत्पन्नाचा दाखला देत होते आज रोजी दहा ते बारा दिवस लागत असल्या कारणाने विविध योजनांचे अर्ज करण्याकरिता नागरिकांना उशीर होत आहे व सेतू केंद वाले अर्जा सोबत पासपोर्ट फोटो मागत आहे या पूर्वी फोटो घेत नव्हते. आपल्या स्तरावर आदेश देऊन लवकरात लवकर उत्पन्नाचा दाखला देण्यात यावे अशी मागणी निवेदनात केली आहे निवेदन देताना फैयाज अहमद, गजानन निखाते, जालिंदर देवकर उपस्थित होते.
Comments
Post a Comment