कोल्हापूर जिल्ह्यातील बेकायदेशीर खाजगी सावकारांच्या वर कारवाई करा- वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष प्रमोद कदम यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.

 कोल्हापूर जिल्ह्यातील बेकायदेशीर खाजगी सावकारांच्या वर कारवाई करा- वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष प्रमोद कदम यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.

------------------------------

कुंभोज प्रतिनिधी 

विनोद शिंगे

------------------------------

कोल्हापूर जिल्ह्यातील खासदार फंड आमदार फंड जिल्हा नियोजन व जिल्हा परिषद  शासनाकडून मागासवर्गीय समाजाचे विकासकामांसाठी येणारा निधी व त्याचे योग्य नियोजन करणेबाबत  तसेच ऐतिहासिक माणगाव  राष्ट्रीय स्मारकाचा 200 कोटींचा नियोजित आराखडा व अंमलबजावणी  शासनाकडून त्वरित करावी,  1970 पासून  जिल्ह्यातील गावठाण वाढ विस्तारात मिळालेले प्लॉट धारकाची नावे सातबारापत्रकी लावणेबाबत शिंगणापूर येथील मागासवर्गीय शेतकरी यांचे सातबारा दुरुस्ती करणेबाबत व राजश्री शाहू स्मारक भवन येथील महापुरुषांची शिल्पे  त्यांची झालेली पडझड दुरुस्ती करणेबाबत तसेच जिल्ह्यातील  बेकायदेशीर खाजगी सावकार करतात त्याचेवर कायदेशीर करणेबाबत व जिल्ह्यातील मागासवर्गीय समाजाचे प्रश्नांबाबत आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. 


आज वंचित बहुजन आघाडीने निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांची भेट घेऊन निवेदन दिले  निवेदनात दिलेल्या विषयी संबंधित प्रशासन अधिकारी यांना याबाबत चौकशी करून कार्यवाही करणेच आश्वासन दिले. याचबरोबर  वंचितच्या  जिल्ह्यातील इतर विषयातील मागण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्यासोबत पुढील आठवड्यात स्वतंत्र बैठक घेण्याचेही आश्वासन दिले. 


यावेळी वंचितचे जिल्हाध्यक्ष प्रमोद कदम, दयानंद कांबळे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासो कांबळे, तुषार कांबळे यांच्यासह  पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.