महाडिक उद्योग समूहाच्या वतीने जिल्हा परिषद शाळांना सीसीटीव्ही कॅमेरे भेट.
महाडिक उद्योग समूहाच्या वतीने जिल्हा परिषद शाळांना सीसीटीव्ही कॅमेरे भेट.
---------------------------
कुंभोज प्रतिनिधी
विनोद शिंगे
---------------------------
महाडिक उद्योग समूहाच्या वतीने शिरोली इथल्या जिल्हा परिषदेच्या आठ शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले आहेत. ज्ञानदीप हायस्कूल येथे या यंत्रणेचा शुभारंभ महाडीक यांच्या हस्ते करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळा आणि परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे अत्यावश्यक बनल्याचे मत यावेळी आमदार अमल महाडिक यांनी व्यक्त केले. महाडिक उद्योग समूह नेहमीच अशा विधायक उपक्रमांसाठी कृतिशील मदत करेल असा विश्वास यावेळी ग्रामस्थांना दिला. यावेळी शिक्षक आणि ग्रामस्थांच्यावतीने केलेल्या सत्काराचा विनम्रपणे महाडिक यांनी स्वीकार केला. या कार्यक्रमाला कृष्णात करपे ग्रामपंचायत सदस्य आरिफ सर्जेखान, हर्षदा यादव, अनिता शिंदे, धनाजी यादव, संतोष यादव, संदेश शिंदे, दीपक यादव, दत्ता पुजारी, शिवाजी कोरवी, संपत चौगले, केंद्रप्रमुख कृष्णात पाटील, मुख्याध्यापिका दीपा देऊळकर, अंजना संकपाळ, राजेश जाधव, बाळासाहेब आळतेकर, संदीप कोरवी, अनिता कुंभार, तबस्सूम पटेल, झाकीर मुजावर यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.
Comments
Post a Comment