दूधगंगा व्हॅली पब्लिक स्कूल मध्ये संपन्न झाला विविध गुणदर्शन सोहळा मंत्री प्रकाश आबिटकर यांची उपस्थिती.
दूधगंगा व्हॅली पब्लिक स्कूल मध्ये संपन्न झाला विविध गुणदर्शन सोहळा मंत्री प्रकाश आबिटकर यांची उपस्थिती.
-----------------------------बिद्री प्रतिनिधी
विजय कांबळे
-----------------------------
दूधगंगा व्हॅली पब्लिक स्कूल ईस्पूर्ली ता करवीर या शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर उपस्थित होते. सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव मिळतो. दरवर्षी ही शाळा अशा कार्यक्रमांचे आयोजन करते. भव्यदिव्य व्यासपीठ तसेच विद्युत रोषणाईने शाळेचा संपूर्ण परिसर उजळून निघाला होता.
मंत्री प्रकाश आबिटकर आपल्या मनोगतात म्हणाले की, अल्पावधीतच या शाळेने उंच भरारी घेतली आहे. आपल्या पाल्याच्या उज्वल भविष्यासाठी निश्चिंत होऊन या शाळेत प्रवेश घ्यावा कारण डॉक्टर झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करताना मला मनस्वी आनंद झाला. असे वक्तव्य त्यांनी यावेळी केले.या वेळी शाळेचे आजी- माजी विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.या कार्यक्रमाला मुंबई हायकोर्टाचे वकील प्रशांत भावके, उद्योजक राम सावरतकर, माजी जिल्हा परिषद सदस्य एकनाथ पाटील, श्रीपतरावदादा सहकारी बँकेचे संचालक रणजित शेळके, ईस्पूर्ली गावचे सरपंच लखन बाबर, उपसरपंच संजय कांबळे, संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब राऊत सर, प्राचार्या मीरा राऊत मॅडम सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उज्वला पाटील मॅडम व विजय कांबळे सर यांनी केले.
Comments
Post a Comment