आ. चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली शिवराज पाटील होटाळकरासह अनेकांचा राष्ट्रवादीत प्रवेश : अजित दादांच्या उपस्थितीत मुंबईत रंगला पक्ष प्रवेश सोहळा.

 आ. चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली शिवराज पाटील होटाळकरासह अनेकांचा राष्ट्रवादीत प्रवेश : अजित दादांच्या उपस्थितीत मुंबईत रंगला  पक्ष प्रवेश सोहळा.

-----------------------------

लोहा प्रतिनिधि 

अंबादास पवार 

-----------------------------

लोहा - कंधार विधानसभा मतदारसंघाचे आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांच्यासह नायगाव विधानसभा मतदारसंघातील शेकडो कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला . पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,  प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. 

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष जीवन पाटील घोगरे, माजी सभापती व्यंकटराव पाटील गोजेगावकर, माजी जिल्हा परिषद सदस्य विनायकराव पाटील मांजरमकर, मारोती वाडेकर, माधव पावडे, धर्माबाद कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अशोक पाटील वडजे, शिवराज पाटील गाडीवान, संजय पाटील शिंदे, गंगाजी पाटील मुगावकर, सटवाची मोदलवाड, श्रीपत पाटील शिंदे, माधव पाटील उपासे, शिवाजी पाटील पवार, बापूराव पाटील पवार, चंद्रकांत पाटील पवार, गणेश पाटील पवार, मनोहर पाटील हिवराळे, बालाजी पाटील, विलास पाटील धुपेकर, दत्तात्रय पाटील होटाळकर, भाऊराव पाटील पवार, देवराज पाटील पवार, गुरुराज पाटील पवार, चंद्रकांत पाटील पवार, जेजेराव पाटील पवार, राजू पाटील बावणे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत शिवराज पाटील होटाळकर आणि शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश झाल्यानंतर पक्ष वाढीसाठी आगामी काळात आपण निश्चितपणे चांगल्या पद्धतीने काम कराल अशी अपेक्षा व्यक्त करत शिवराज पाटील होटाळकर यांच्यासह पक्षात प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांना अजितदादा पवार यांनी शुभेच्छा दिल्या . तर नांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद वाढून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मोठे यश मिळविण्यासाठी ताकतीने काम करू यासाठी शिवराज पाटील आणि त्यांची संपूर्ण टीमने जोमाने काम करेल असा विश्वास आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केला.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.