शिवपुतळ्याची प्रतिष्ठा ही मंडलिक प्रतिष्ठानची जबाबदारी ;ड. वीरेंद्र मंडलिक .

 शिवपुतळ्याची प्रतिष्ठा ही मंडलिक प्रतिष्ठानची जबाबदारी ;ड. वीरेंद्र मंडलिक .

------------------------------------

मुरगूड प्रतिनिधी

जोतीराम कुंभार

------------------------------------

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची ॲड. मंडलिक यांच्याकडून पाहणी.

मुरगूड नगर परिषदेच्या प्रांगणातील अश्वारूढ शिव पुतळ्याची प्रतिष्ठा ही मंडलिक प्रतिष्ठानची नैतिक जबाबदारी आहे. शिवजयंतीनंतर पुतळ्याच्या रंग व कोटींगचे काम करणार असल्याची ग्वाही मंडलिक युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड.वीरेंद्र मंडलिक यांनी दिली. मात्र पुतळ्याला तडा गेल्याच्या अफवा पसरून समाजमाध्यमाद्वारे सामाजिक तेढ करून राजकारण करणाऱ्यांची शिवप्रेमी व शिवभक्त नागरीक  गय करणार नाहीत. असा सज्जड इशाराही ॲड. मंडलिक यांनी दिला.


मुरगूड नगरपारिषदेच्या प्रांगणात तीन वर्षापूर्वी मंडलिक युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष वीरेंद्र मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली  लोकसहभागातून पालिकेच्या प्रांगणात सुमारे पावणेदोन टन वजनाच्या पंचधातू पासून बनवलेल्या शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याची स्थापना करण्यात आली आहे. तर मुरगूड नगर परिषदेने चबुतऱ्याचे बांधकाम केले आहे.पुतळ्याची देखभाल व  पावित्र राखण्याची जबाबदारी मंडलिक युवा प्रतिष्ठान करेल असे  प्रतिज्ञापत्र प्रतिष्ठानने  पुतळा उभारणीवेळी मुरगूड नगरपरिषदेस दिले आहे. तसेच  दर तीन वर्षांनी या पुतळ्याची  डागडूजी पॉलिश व रंगकामाची जबाबदारीही प्रतिष्ठानने घेतली आहे.


मात्र काहींनी जाणिवपूर्वक  पुतळ्याला तडा गेल्याच्या  अफवा पसरवून जिल्हाधिकारी कार्यालयात  हा विषय मांडून समाजामध्ये तेढ निर्माण  करण्याचा प्रयत्न केला. त्या पार्श्वभुमीवर ॲड. मंडलिक यांनी आज शिवप्रेमी , शिवभक्त व सर्वपक्षीय नागरिकांच्या समवेत पुतळा परिसराची पाहणी केली. 

पाहणीत  पुतळ्यास कोणत्याही प्रकारची इजा झाली नसून केवळ

पुतळ्यावरील रंग  गेल्याचे दिसून आले.


यावेळी माध्यमांसमोर बोलताना ॲड. मंडलिक म्हणाले, "  पुतळा उभारणीस तीन वर्षे पूर्ण होत आहेत. प्रतिष्ठानने  साताऱ्याहून  आरिफ तांबोळी व समाधान हेंदळकर या तज्ञांच्या मदतीने  पुतळ्याची  तपासणी केली. त्यात पुतळ्यास कोणत्याही प्रकारची इजा पोचलेली नाही. मात्र    पंचधातूतील  तांबे धातूचा पाण्याशी संपर्क आल्याने  हिरवट रंगाच्या पावडरचा थर जमा होत असल्याचे तांबोळी यांनी निदर्शनास आणून दिले आहे. त्यानुसार शिवजयंतीनंतर   पुतळ्याचे  पॉलिश व रंगकाम होईल.

मात्र काहींनी पुतळ्यास तडे गेल्याची अफवा सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवली.त्याचा शिवप्रेमी नागरीकांनी  निषेध सभा घेऊन धिक्कार केला.ज्यांनी  पुतळ्याच्या बाबतीत चुकीची अफवा पसरवली त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणीही मुरगुड पोलीस ठाण्याकडे केली. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर वातावरण बिघडवण्याचे काम करणाऱ्यांचा त्यांनी तीव्र शब्दात समाचार घेतला.

   यावेळी ॲड.मंडलिक यांनी पालिकेचे मुख्याधिकारी अतिष वाळुंजे यांची भेट घेऊन पुतळ्याच्या डागडूजीबाबत प्रतिष्ठानची भूमिका मांडली. तसेच पालिकेने परवानगीशिवाय कोणालाही पुतळ्यावर चढण्यास परवानगी देऊ नये. अशी मागणी केली.

 शिवभक्त सर्जेराव भाट ,ओंकार पोतदार यांनी ॲड.मंडलिक यांना पुतळ्या संदर्भात माहिती दिली. यावेळी एस व्ही चौगले , किरण गवाणकर, दत्ता मंडलिक, संभाजी आंगज, सर्जेराव भाट,ओंकार पोतदार,प्रल्हाद भोपळे, मयूर आंगज , शुभम भोसले, यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.