कार्यकारी संचालक धनंजय औंढेकर यांनी साधला जिल्ह्यातील जनमित्रांशी संवाद.

 कार्यकारी संचालक धनंजय औंढेकर यांनी साधला जिल्ह्यातील जनमित्रांशी संवाद.

-------------------------------

रिसोड प्रतिनिधी

रणजीत सिंह ठाकुर 

-------------------------------

*वीज ग्राहकांप्रमाणे महावितरण वीज निर्मिती कंपन्यांची एक ग्राहक*


_• १०० % वीजबिल वसुलीसाठी मोहीम राबवा_


_• अचूक वीजबिल निश्चित करण्यासाठी फॉल्टी मीटर बदला_


वाशीम,दि.२४ जानेवारी २०२५;

        

        महावितरण वीज निर्मिती करत नाही. वीज ग्राहकांप्रमाणेच महावितरण वीज निर्मिती करणाऱ्या कंपन्यांची एक ग्राहक आहे.त्यामुळे वीज ग्राहकांना वेळेत वीजबिल भरण्याची सवय लावा,तसेच १००% वीजबिलाच्या वसुलीसाठी मोहिम राबवा असे स्पष्ट निर्देश कार्यकारी संचालक (विशेष प्रकल्प) धनंजय औंढेकर यांनी दिले.


        वाशीम (महालक्ष्मी लॉन) येथे जनमित्रांशी संवाद साधतांना ते बोलत होते.यावेळी मुख्य अभियंता सुहास रंगारी,अधीक्षक अभियंता अजय शिंदे,कार्यकारी अभियंता जीवन चव्हाण यांच्यासह जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अभियंते आणि सुमारे पाचशे जनमित्र उपस्थित होते.


        यावेळी बोलतांना कार्यकारी संचालक म्हणाले की,महावितरणचे अस्तित्व हे वीज बिलाच्या १००% वसुलीवर आहे. त्यामुळे विजेचे बिल थकणार नाही याची दक्षता घ्या.तसेच थकबाकी विरोधात मोहिम राबवून १००% वीजबिल वसुल करा.ग्राहकांना अचूक विजबिल देण्याची जबाबदारी ही महावितरणची आहे.त्यामुळे फॉल्टी मीटर असलेल्या ग्राहकांचे मीटर तत्काळ बदला आणि त्यांचे वीजबिल सुनिश्चित करा.


       वितरण हानी कमी करण्याचे जिल्ह्यात मोठे आवाहन आहे. त्यामुळे वीज चोरीवर विशेष लक्ष केंद्रीत करा.वीज चोरी विरोधात राबवित असलेल्या मोहिमेत सातत्य राखा.वीज चोरी हा फौजदारी गुन्हा आहे हे वीज चोराच्या लक्षात आणून द्या.तसेच कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांची प्राधान्याने तपासणी करा,अनाधिकृत वीज पुरवठा आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करा असे स्पष्ट निर्देश यावेळी त्यांनी दिले.


          राज्य वीज नियामक आयोगाच्या मानकांनुसार नवीन वीज जोडणी विहित मुदतीत देणे बंधणकारक आहे, मुदतीनंतर विज जोडणी दिल्याचे आढळल्यास कर्मचाऱ्यांना यापुढे दंड भरावा लागणार आहे. त्यामुळे वाशीम शहरात २४ तासात वीज जोडणी देण्याला सुरूवात करावी असे निर्देश यावेळी त्यांनी दिले.


        मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०, प्रधानमंत्री सुर्यघर मोफत वीज योजना,मागेल त्याला सौर कृषी पंप योजना,सौर ग्राम योजना या शासनाच्या विविध महत्वाकांक्षी योजनांचा सविस्तर आढावा घेत उद्धीष्टानुसार काम करण्याचे निर्देश यावेळी कार्यकारी संचालक श्री.धनंजय औंढेकर यांनी दिलेत. यावेळी मुख्य अभियंता सुहास रंगारी यांनीही जनमित्रांशी संवाद साधत वीजबिल वसुली आणि ग्राहकाभिमूख सेवा देण्यासाठी जनमित्रांना प्रेरीत केले.

       


फोटो ओळ - कार्यकारी संचालक(विशेष-प्रकल्प)श्री धनंजय औंढेकर,सोबत मुख्य अभियंता सुहास रंगारी,अधीक्षक अभियंता अजय शिंदे, कार्यकारी अभियंता जीवन चव्हाण आणि समोर उपस्थित जनमित्र

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.