कुंभोज एसटी स्टँड परिसरातून टू व्हीलर गाडीची चोरी
कुंभोज एसटी स्टँड परिसरातून टू व्हीलर गाडीची चोरी.
--------------------------------
कुंभोज प्रतिनिधी .
विनोद शिंगे
--------------------------------
कुंभोज तालुका हातकणंगले येथे एसटी स्टँड परिसरात राहणाऱ्या अजित दामू भोरे यांची टू व्हीलर गाडी (क्र.MH 09 CC 2034) अज्ञात चोरट्याने रात्री 1 वाजून 27 मिनिटांनी चोरी केली आहे .सदर चोरी करत असतांचे फुटेज सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून सदर भुरट्या चोरांचा बंदोबस्त हातकणंगले पोलिसांनी करावा अशी मागणी कुंभोज परिसरातील नागरिकांच्यातून सध्या जोर धरत आहे. सध्या कुंभोज येथे भूरट्या चोरांच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून अशा भुरट्या चोऱ्या करणाऱ्या चोरांचा तात्काळ बंदोबस्त झालाच पाहिजे अशा आशयाचे मत महिला वर्गातून व्यक्त होत आहे. विनोद शिंगे कुंभोज
Comments
Post a Comment