मीपणा सोडल्यावर समाजसेवा घडते : रवी बोडके.
मीपणा सोडल्यावर समाजसेवा घडते : रवी बोडके.
---------------------------------------
वाई प्रतिनिधी
कमलेश ढेकाणे
---------------------------------------
वाई: 'राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना श्रमाचे महत्व समजते. पण एन. एस.एस.म्हणजे फक्त साफसफाई नसून, सेवेचे व्रत आहे. समाजसेवेसाठी मनाची तिव्र इच्छा हवी, त्यासाठी अहंकार सोडावा लागेल, कारण मीपणा सोडल्यावर समाजसेवा घडते असे प्रतिपादन वेळे येथील यशोधन अनाथाश्रमाचे अध्यक्ष रवी बोडके यांनी केले.
वाई येथील किसन वीर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या उद्द्घाटनप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.
याप्रसंगी सरपंच वनिता ननावरे, उपसरपंच अनिल मांढरे, उपप्राचार्य डॉ. हणमंतराव कणसे, भीमराव पटकुरे सल्लागार डॉ. राजेश गावित, मनोहर मांढरे, मुख्याध्यापक सुनील शेलार, समर्थ मांढरे, कॅप्टन डॉ. समीर पवार, कार्यक्रम अधिकारी डॉ संग्राम थोरात, डॉ. अंबादास सकट, संदीप पातुगडे, रवींद्र जमदाडे, प्रतिक्षा मांढरे, मेघा शिर्के यांची उपस्थिती होती.
रवी बोडके म्हणाले, माणूस यशस्वी होण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. तुमचा हा घडण्याचा काळ आहे. हे स्पर्धात्मक युग आहे त्यामुळे स्वतःला सिद्ध करा. एखादा छंद जोपासा. आजकाल कुणाकडेच वेळ नाही. प्रत्येकजण मोबाईल मध्ये व्यस्त आहे.समाजसेवा करताना सगळे सोडावे लागले. छोट्या छोट्या गोष्टींतून सेवा साधता येते. आपले मानसिक स्वास्थ्य जपा. समाज खूप चांगला आहे समाजासाठी जंगलं पाहिजे. त्यांनी आपल्या भाषणातून संशोधन संस्था कशी उभा राहिली ते सांगितले.
सरपंच वनिता ननावरे यांनी शुभेच्छा दिल्या, उपसरपंच अनिल मांढरे म्हणाले, शिबिराच्या निमित्ताने आमच्या गावातून चांगले विचार घेऊन जावे. या गावात तुम्हाला काही कमी पडणार नाही. मनोहर मांढरे यांनीही मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे म्हणाले, 'आमचे विद्यार्थी गावकऱ्यांच्या सादाला प्रतिसाद देतील, निर्हेतुक केलेले काम ही सेवा असते. सेवेला कोणताही मोबदला नसतो. शिबिराच्या निमित्ताने संस्कार शिकायचे आहेत. या गावाची परंपरा समजून घ्या. उत्तम विचार, आचार, उत्तम संस्कार व श्रम देऊन इथले अनुभव व आठवणी घेऊन जाऊया.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भूमिका वाडकर, कल्याणी जाधव, मुक्ता वाडकर, सिद्धी सावंत, श्रेया शिंदे, सानिका सणस यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रम अधिकारी डॉ. संग्राम थोरात यांनी प्रास्ताविक केले. सुमती कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम अधिकारी डॉ. अंबादास सकट यांनी आभार मानले.
कार्यक्रमास स्वयंसेवक व धावडी ग्रामस्थ उपस्थित होते.
Comments
Post a Comment