हातकलंगले तालुका डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेच्या संपर्क प्रमुख पदी विनोद शिंगे यांची निवड.

 हातकलंगले तालुका डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेच्या संपर्क प्रमुख पदी विनोद शिंगे यांची निवड.

--------------------------------

कोल्हापूर प्रतिनिधी

शशिकांत कुंभार 

--------------------------------

कुंभोज गावचे सुपुत्र  पत्रकार विनोद शिंगे यांची डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या हातकणंगले तालुका संपर्क प्रमुख पदी निवड कोल्हापूर जिल्हा डिजिटल मीडियाचे जिल्हा अध्यक्ष भाऊसाहेब फास्के यांनी केली आहे.

            पत्रकारितेतील त्यांच्या आजवरच्या  कार्याची दखल घेऊन डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रच्या हातकणंगले तालुका संपर्कप्रमुखपदी विनोद शिंगे यांची निवड करीत असल्याचे तालुकाध्यक्ष कीर्तीराज जाधव यांनी सांगितले सध्याच्या युगात डिजिटल मीडिया सर्वसामान्य जनतेचा आधारस्तंभ बनत असून पत्रकारितेत डिजिटल मीडियाला एक अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. परिणामी अनेक पत्रकार सध्या डिजिटल मीडियाकडे वळत असून संपूर्ण महाराष्ट्रात 12000 पेक्षा जास्त पत्रकार सदर संघटनेचे सभासद आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात साडेचारशे सभासद असून वेगवेगळ्या टीव्ही चॅनेल, युट्युब चॅनेल च्या माध्यमातून समाज परिवर्तन करण्याची महत्त्वाची भूमिका डिजिटल मीडियाच्या मार्फत केली जाते .असे गौरव उद्गार तालुकाध्यक्ष कीर्तिराज जाधव यांनी बोलताना व्यक्त केले. हातकणंगले तालुका डिजिटल मीडियाच्या संपर्कप्रमुख पदी विनोद शिंगे यांच्या नावाची घोषणा जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब फास्के यांनी केली.  पत्रकार विनोद शिंगे यांच्या निवडीबद्दल त्यांचे सामाजिक राजकीय शैक्षणिक स्तरातून अभिनंदन होत आहे.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.