किसन वीर महाविद्यालयात स्व. लक्ष्मणराव पाटील (तात्या) यांना अभिवादन.
किसन वीर महाविद्यालयात स्व. लक्ष्मणराव पाटील (तात्या) यांना अभिवादन.
----------------------------------
वाई प्रतिनिधी
कमलेश ढेकाणे
----------------------------------
जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील स्टाफ वेल्फेअर समितीच्या वतीने जनता शिक्षण संस्थेचे माजी उपाध्यक्ष व विश्वस्त लक्ष्मणराव पाटील (तात्या) यांना सहाव्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरूनाथ फगरे यांच्या हस्ते त्यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून आदरंजली वाहण्यात आली.
प्राचार्य डॉ गुरुनाथ फगरे म्हणाले की, सातारा जिल्हा हा थोर पुरुष व क्रांतिकारकांचा जिल्हा आहे. लक्ष्मणराव पाटील यांनी संपूर्ण जीवनभर समाजकार्य केले. त्यांनी वाई तालुक्यातील बोपेगाव सारख्या छोट्या खेड्यातून आपली राजकिय कारकीर्द सुरू केली. सामाजिक, राजकिय, शैक्षणीक, सहकार आदी क्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिले. त्यांनी स्व. यशवंतराव चव्हाण व किसन वीर आबा यांच्या साथीने वाई तालुका व सातारा जिल्ह्याचा विकास केला. ते सर्वसामान्य जनतेशी नाळ असलेले व्यक्तिमत्व होते. जनता शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त स्व. प्रतापराव भोसले (भाऊ) अध्यक्ष व लक्ष्मणराव पाटील (तात्या) उपाध्यक्ष असताना दोन्हीही महान विभूतींनी महाविद्यालयात राजकारण न आणता विद्यार्थी व समाजहित जपले. या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. भीमराव पटकुरे तसेच प्रो. डॉ. ज्ञानदेव झांबरे, डॉ. शिवाजी कांबळे, डॉ. अंबादास सकट यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. राहुल तायडे, श्री. भानुदास चौधरी आदींनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment