निष्काळजीपणे ट्रॅक्टर चालवून एकाचा बळी घेणाऱ्या ट्रॅक्टर चालकाला अटक.
निष्काळजीपणे ट्रॅक्टर चालवून एकाचा बळी घेणाऱ्या ट्रॅक्टर चालकाला अटक.
---------------------------------
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
---------------------------------
राधानगरी तालुक्यातील फराळे येथील ओकार शुगर कारखाना जवळ निष्काळजीपणाने ट्रॅक्टर चालवून एकाचा बळी गेल्याची माहिती राधानगरी पोलिसांनी दिली याप्रकरणी ट्रॅक्टर चालक शुभम चौगुले यास अटक
यावर अधिक माहिती अशी की फराळे येथील ओंकार शुगर कारखान्या ला ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर नंबर एम एच झिरो नाईन इ यु २८०२ हा सोहे ल मन्सूर पठाण वय 22 राहणार धरमनगरी कोंडगाव जिल्हा परभणी यांच्याकडील ट्रॅक्टर शुभम कृष्णात चौगुले राहणार कावणे तालुका करवीर याने ताब्यात घेऊन निष्काळजी पणे चालवत असताना ट्रॅक्टर वरील ताबा सुटल्याने ट्रॅक्टर चालक सोहेल पठाण याला जोरात धडक बसल्याने तो जागीच ठार झाला .
याबाबतची फिर्याद किरण सर्जेराव पाटील राहणार वडकशिवाले यांनी राधानगरी पोलीस स्टेशनला दिली असून याबाबत शुभम चौगुले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्या ट्रॅक्टर चालकास राधानगरी पोलिसानीं अटक केली याबाबत अधिक तपास राधानगरी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे व कॉन्स्टेबल कृष्णात खामकर सूर्यवंशी हे करत आहेत
Comments
Post a Comment