टाकवडे येथील 'आनंदी स्वीट्स अँड नमकीन' कंपनीला लागली आग पाऊण कोटीचे नुकसान सुदैवाने जिवितहानी नाही.
टाकवडे येथील 'आनंदी स्वीट्स अँड नमकीन' कंपनीला लागली आग पाऊण कोटीचे नुकसान सुदैवाने जिवितहानी नाही.
कोल्हापूर प्रतिनिधी
शशिकांत कुंभार
-------------------------
सोमवार, दिनांक 27 जानेवारी रोजी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास आनंदी स्वीट्स अँड नमकीन या कंपनीला भीषण आग लागली.आगीची माहिती मिळताच इचलकरंजी, जयसिंगपूर आणि कुरुंदवाड येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन तासांच्या अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आणली.
या आगीत कंपनीतील नमकीन, कुरकुरे, स्वीट साहित्य, मशिनरी, गॅस टाक्या आणि इमारत संपूर्णपणे जळून खाक झाल्या . प्राथमिक अंदाजानुसार, या आगीत कंपनीला सुमारे 70 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.घटनास्थळी शिरोळ पोलीस ठाण्याचे अभिजित कांबळे आणि श्री पटेल यांनी भेट देऊन पाहणी केली.तसेच घटनास्थळाचा पंचनामा सुरू असून पंचनामा झाल्यानंतर किती नुकसान झाले हे कळेल
रात्रीची वेळ असल्यामुळे, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.मात्र,कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याने मालक व कर्मचारी,ग्रामस्थातुन हळहळ व्यक्त होत आहे.
Comments
Post a Comment