हसणे तालूका राधानगरी येथे माकडांचा धुमाकूळ.
हसणे तालूका राधानगरी येथे माकडांचा धुमाकूळ.
---------------------------------
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
---------------------------------
सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग येथील वन विभागाने आपल्या हद्दीतील माकडे दाजीपूर जंगलातील हसणे गावांच्या हद्दीत सोडली असून त्या माकडाने धुमाकूळ घालत घराच्या कौलाचे नुकसान केले असल्याने माकडाचा बंदोबस्त वन विभागाने तातडीने करण्यात यावा अन्यथा 15 जानेवारी 25 रोजी कार्यालयासमोर आंदोलन केले जाईल असा इशारा हसणे ग्रामस्थांच्या वतीने पंढरीनाथ
पाटील यांनी दाजीपूर वन विभागाला दिला आहे
सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग येथील वन विभागाने आपल्या हद्दीतील माकडे शासनाच्या वनविभागाच्या गाडीतून दाजीपूर अभयारण्य क्षेत्रातील हसणे गावामध्ये सोडून वन कर्मचारी जात असताना हसणे ग्रामस्थांनी वन विभागाची गाडी थांबवून आमच्या गावामध्ये माकडे का सोडली अशी विचारणा वन कर्मचाऱ्यांना केले असताना आम्हाला सावंतवाडी रेंजर यांनी दाजीपूर जंगलात सोडून या असे कर्मचारी यांना सांगितले त्या सोडलेल्या माकडाने हसणे गावामध्ये धुमाकूळ घालून घराचे घरातील प्रापंचिक साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत त्याचा दाजीपूर वन विभागाने तातडीने बंदोबस्त करण्यात यावा अन्यथा 15 जानेवारी 25 रोजी दाजीपूर वन विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन केले जाईल असा इशाराचे निवेदन हसणे ग्रामस्थांनी दाजीपूर अभयारण्याचे रेंजर यांना एका निवेद्वारे दिला असल्याची माहिती हसणे ग्रामस्थांच्या वतीने पंढरीनाथ पाटील यांनी दिली या निवेदनावर ग्रामस्थांच्या सह्या असल्याचे पाटील यांनी सांगितले
Comments
Post a Comment