वाई: दि. विद्यार्थ्यांनी फुलासारखे पंख पसरून ज्ञानाचा आनंद घेत जीवन विकसित करावे.
वाई: दि. विद्यार्थ्यांनी फुलासारखे पंख पसरून ज्ञानाचा आनंद घेत जीवन विकसित करावे.
----------------------------------
वाई प्रतिनिधी
कमलेश ढेकाणे
----------------------------------
पुस्तकांबरोबरच निसर्गाचे आणि माणसांचेही वाचन करण्याचे कौशल्य अंगीकारले पाहिजे. स्वतःबरोबरच समाजाचीही उन्नती होईल अशी उंच स्वप्ने उराशी बाळगून जीवनाची वाटचाल केली पाहिजे, असे उद्गार प्रसिद्ध मराठी लेखिका शेतीतज्ज्ञ व समाजसेविका श्रीमती रेणू दांडेकर यांनी काढले.
येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभामध्ये प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. संस्थेचे अध्यक्ष मा. मदनदादा भोसले हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. सचिव डॉ. जयवंत चौधरी, प्राचार्य डॉ. गुरूनाथ फगरे, उपप्राचार्य श्री बाळासाहेब कोकरे पर्यवेक्षक व कार्याध्यक्ष श्री अर्जुन जाधव, क्रीडा शिक्षक श्री सचिन चव्हाण, श्री मदन जाधव हे व्यासपीठावर उपस्थित होते.
श्रीमती रेणू दांडेकर आपल्या भाषणात पुढे म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी विपूल वाचन केल्याशिवाय त्यांचे विचार भावना आणि सृजनशीलता यांचा विकास होत नाही. व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास झाल्याशिवाय जगण्याचे गणित सोडवता येत नाही. मी पणाचा त्याग केला तरच संतांचे तत्त्वज्ञान आत्मसात करता येईल आणि माणसाला माणसासारखे जगता येईल. अलीकडच्या काळात युवा वर्गामध्ये निर्माण होणारी नैराश्याची भावना ही निष्क्रियतेतून जन्माला येत असते म्हणूनच तरुणांनी नोकरीच्या मागे न धावता उद्योगशील झाले पाहिजे.
अध्यक्षीय भाषणात मा. मदनदादा भोसले म्हणाले, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर कोणतेही आव्हान पेलण्याची क्षमता विद्यार्थ्यांनी स्वतःमध्ये निर्माण केली पाहिजे. मोठी स्वप्न उराशी बाळगणारे युवक त्यावर प्रथम विचार करतात व ती साकार करण्यासाठी कृतीयुक्त पावले टाकतात. अशा ध्येयवादी तरुणांना हमखास यश प्राप्त होते. शिक्षण घेऊन नोकरीसाठी शहराची वाट धरण्यापेक्षा कौशल्ये आत्मसात करून ग्रामीण भागात उद्योग व्यवसाय उभे करणे ही आजची काळाची गरज आहे. आजची तरुणाई गावगाडा आणि समाजापासून दुरावत चालली आहे ही चिंतेची बाब असून यासाठी शिक्षण प्रक्रियेमध्ये आमुलाग्र बदल होणे गरजेचे आहे.
कार्यक्रमाचे आरंभी स्व. न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, रामभाऊ जोशी आणि महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. आर्या पोळ यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तर तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी देशभक्त किसन वीर आणि संस्थेचे विश्वस्त प्रतापराव भोसले यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे यांनी मान्यवरांचे स्वागत व प्रस्ताविक केले. उपप्रचार्य श्री. बाळासाहेब कोकरे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. पर्यवेक्षक व कार्याध्यक्ष श्री अर्जुन जाधव यांनी शैक्षणिक अहवालाचे वाचन केले क्रीडा शिक्षक श्री सचिन चव्हाण यांनी क्रीडा अहवाल सादर केला. श्री. नितीन कस्तुरे यांनी शैक्षणिक पारितोषिकांच्या यादीचे वाचन केले, श्री मदन जाधव यांनी क्रीडा पारितोषकांचे वाचन केले. बीआयएस पारितोषिकांचे वाचन श्री. शशांक ढोणे यांनी केले. महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. भक्ती वायदंडे हीने इशस्तवन व पसायदान गायले. श्री. हरेश कारंडे यांनी उपस्थितांचे यांचे आभार मानले. सौ गोरी पोरे, सौ नयना मोरे व श्री सुमित वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले. श्री. श्रावण पवार श्री. सुशांत स्वामी, डॉ. विलास खंडाईत श्री. सतीश तावरे श्री. जितेंद्र चव्हाण श्री. भानुदास चौधरी श्री. सचिन कुंभार यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
संस्थेचे ज्येष्ठ संचालक श्री. केशवराव पाडळे खजिनदार प्रा. नारायण चौधरी श्री. चंद्रकांत इंगवले वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. (डॉ.) चंद्रकांत कांबळे, डॉ. हणमंतराव कणसे, श्री भीमराव पटकुरे, कार्यालय प्रमुख श्री. बाळासाहेब टेमकर कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सेवक वर्ग व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment