स्वामी विवेकानंद विद्यालयात क्रीडा साप्ताहाचे आयोजन.

 स्वामी विवेकानंद विद्यालयात क्रीडा साप्ताहाचे आयोजन.

------------------------------------------

रिसोड/तालुका प्रतिनिधी.

रणजीत सिंह ठाकुर

-------------------------------------------

स्वामी विवेकानंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व्याड येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त वार्षिक क्रीडा साप्ताहाचे आयोजन दि. 16 ते 24 जानेवारी दरम्यान करण्यात आले आहे. 16 जानेवारीला क्रीडा साप्ताहाचे उदघाट्न करण्यात आले. प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस डी जाधव व विद्यार्थ्यांचे पालक सय्यद जुबेर यांच्या हस्ते खेळाचे मैदान व क्रीडा साहित्याचे पूजन उदघाट्न करण्यात आले. प्रसंगी विद्यालायाचे क्रीडा विभाग प्रमुख शिक्षक गणेश हेंबाडे, जेष्ठ शिक्षक जग्गनाथ भिसडे, एन पी वाघ यांच्या सह रवि अंभोरे, गजानन घाटोळ, ज्ञानेश्वर मांडे, प्रा. गजानन लांभाडे, प्रा. अमोल देशमूख, रामेश्वर पवार, कु. दुर्गा घोगरे, प्रा.प्रवीण सरनाईक,प्रा.उमेश पडघान इत्यादी शिक्षक व गजानन बोंडे,रमेश पडघान, गणेश बनसोड,नरेश बचाटे, भारत माकोडे, वैभव राजे इत्यादी शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. क्रीडा विभाग प्रमुख गणेश हेंबाडे यांनी विद्यार्थ्यांना शालेय खेळातील सहभागाचे महत्व सांगून क्रीडा सप्ताहा दरम्यान प्रत्येक विद्यार्थाने खिलाडी वृत्तीने खेळात सहभाग घेऊन विद्यालयाची शिस्त,स्वछता आणि शांतता टिकवून ठेवण्यासाठी सूचना दिल्या.सहभागी विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रशस्तीपत्र व प्रथम क्रमांक घेणाऱ्या सांघिक व वैयक्तिक खिलाडूला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ऍड दिलीपराव सरनाईक, स्थानिक अध्यक्ष त्र्यंबकराव दादा बोंडे, डॉ विशवनाथ गायकवाड, चंद्रकांत नाना बोंडे, जनार्धन बोंडे, गजानन हेंबाडे, झिंगराजी हेंबाडे इत्यादी मान्यवरांच्या हस्ते पदक व प्रशस्ती देऊन  प्रोत्साहित व सन्मानित करण्यात येणार आहे. वर्ग 5 ते 12 पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी कब्बडी, खोखो, क्रिकेट, संगितखुर्ची, धावण्याची शर्यत इत्यादी खेळांचा समावेश करण्यात आला आहे. विद्यार्थांनी सहभागी होऊन आपल्या क्रीडा कौशल्यना विकसित करण्याचे आवाहन प्राचार्य जाधव यांनी विद्यार्थ्यांना केले.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.