बिबट्याचा शेळ्यांवर हल्ला चार मृत एक जखमी.
बिबट्याचा शेळ्यांवर हल्ला चार मृत एक जखमी.
-------------------------
रिसोड प्रतिनिधी
रणजित सिंह ठाकुर
-------------------------
रिसोड : बिबट्याच्या हल्ल्यामध्ये चार शेळ्याचा मृत्यू तर एक जखमी झाल्याची घटना दिनांक 30 जानेवारी रोजी रात्रीच्या दरम्यान रिसोड करडा मार्गावर बिबखेड शेत शिवारामध्ये वसंता देवबा मोरे यांच्या शेतात घडली. याबाबत माहिती अशी की रिसोड येथील वसंता देवबा मोरे यांची रिसोड करडा मार्गावर बिबखेड शिवारामध्ये शेती असून शेतीसह जोडधंदा म्हणून त्यांच्याकडे पशुपालन व्यवसाय आहे. यामध्ये गाय बैल म्हैस ऐवजी शेळ्या आहेत. त्यांच्याकडे 15 ते 20 शेळ्या असून दैनंदिन प्रमाणे ते दिनांक 30 जानेवारीच्या रात्री आठ ते साडेआठ वाजता चे दरम्यान आपले सर्व काम आटपून जनावरांना चारापाणी करून आपल्या घराकडे निघून गेले. दिनांक 31 जानेवारी रोजी सकाळी जेव्हा ते आपल्या शेतामध्ये आले असता त्यांना हा सदर प्रकार दिसून आला.सदर हल्ला बिबट्याने केला असल्याचे शेतकरी वसंता देवबा मोरे यांचे म्हणणे असून शेळ्यांसाठी लावण्यात आलेल्या टीन शेड ची उंची व यामध्ये चांगलाच अंतर असून अन्य कोणताही प्राणी उडी मारून शेडमध्ये शिरू शकत नाही असा अंदाज आहे मोरे यांनी बोलून सांगितला.बिबट्याने रात्रीच्या दरम्यान सदर प्रकारांमध्ये चारही शेळ्यांचा फडशा पाडून त्यांचे रक्त पिले असल्याचे मोरे यांनी सांगितले. सदर घटनेमध्ये एकूण एक लाख रुपयाचे नुकसान झाले असल्याचे मोरे यांचे म्हणणे असून सदर घटनेचा पंचनामा करून योग्य तो मोबदला देण्यात यावा अशी मागणीही शेतकरी मोरे यांनी केली आहे. सदर घटनेनंतर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून विशेष म्हणजे पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. रात्री अपरात्री केव्हाही घटना घडू शकते अशी शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली असून वन विभागाने बिबट्याचा शोध घेऊन त्याच जेरबंद करावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
Comments
Post a Comment