केनवड येथे भाजप सदस्य नोंदणीला उस्फुर्त प्रतिसाद.जवळपास ३२५ सदस्याची नोंदणी.

 केनवड येथे भाजप सदस्य नोंदणीला उस्फुर्त प्रतिसाद.जवळपास ३२५  सदस्याची नोंदणी.

------------------------------- 

रिसोड प्रतिनिधी

रणजित सिह ठाकूर 

------------------------------- 

विधानसभा निवडणुकीतील यशानंतर भाजपकडून आता सदस्यता नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. हे अभियान ५ जानेवारीपासुन राबविले जात असून यामध्ये रिसोड विधानसभा अभियान प्रभारी म्हणून राजु पाटील राजे, वाशिम प्रभारी म्हणून आमदार श्याम खोडे तर कारंजा प्रभारी म्हणून आ. सईताई डहाके यांची नियुक्ती केली आहे.

केनवड सर्कल मध्ये राजू पाटिल राजे, व अनंतराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली केनवड येथे बुधवार (ता,१५ )जानेवारी रोजी विश्वंभर  खराटे यांच्या उपस्थितीत नोंदणी अभियान अभियानाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी बहुसंख्या भाजप सदस्य यांचे स्वयं स्फूर्तीने ३२५ सदस्याचे नोंदणी करण्यात आली.


नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने राज्यात घवघवीत यश संपादन केले. जिल्ह्यात देखील भाजपने वर्चस्व कायम ठेवत तीन पैकी दोन जागावर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. यामध्ये भाजपचे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष राजु पाटील राजे यांची मोलाची भूमिका राहीली. आता

संपुर्ण राज्यात भाजपकडून पक्षसंघटन वाढीवर भर दिला जात आहे. याअनुषंगाने विधानसभा निहाय प्रभारींची नियुक्ती करण्यात आली असून सदस्य नोंदणी अभियान राबविले जात आहे.


याअनुषंगाने केनवड येथे जास्तीत जास्त युवक, युवती, महिला व नागरीकांची सदस्य नोंदणी करुन गाव, वाड्या वस्त्यावर भाजपची पताका फडकविण्याचा प्रयत्न करु तसेच पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पुर्ण करु, असा विश्वास भाजपचे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष राजु पाटील राजे यांनी व्यक्त केला.माजी सरपंच विश्र्वांबर खराटे,प.स. माजी सभापती अनिल काळे, भाजप तालुका प्रमुख हरिभाऊ पाचंगे , माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तराव खराटे, उपसरपंच विकास खराटे,देवानंद वानखेडे युवा मोर्चा उप तालुका अध्यक्ष विजय खराटे,बंडू खराटे,संदीप साहेबराव गोळे,ज्ञानेश्वर गवळी ,गुणवंत खराटे,सतीश चवरे,गोपाल वानखेडे,अनिल खराटे,अर्जुन खराटे,,तुळशीराम टोंचर,रमेश सरोदे ,नारायण खाटोकर .मोठया संख्येने कार्यकर्ते व गांवकरी मंडळी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.