अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण कुस्तीगिराना सुवर्ण संधि
अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण कुस्तीगिराना सुवर्ण संधि.
--------------------------------------
अमरावती जिल्हा प्रतिनिधी.
पी.एन. देशमुख.
-----------------------------------------
खेलो नागपुर खेलो, खासदार क्रीड़ा महोत्सव 202५मधे नागपुर येथे 2६ व 2७ जनवरी 202५ विदर्भ स्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन होणार असून यामध्ये अमरावती जिल्ह्यातील दोन संघ या कुस्ती स्पर्धेसाठी माननीय माजी खासदार रामदाजी तडस व विदर्भ केसरी संजय तिरथकर यांच्या प्रयत्नाने खासदार क्रीडा महोत्सवात ग्रामीण युवकांना खेळायला मिळणार आहे. ग्रामीण कुस्तीगरांना प्रोत्साहन मिळावे म्हणून एक ग्रामीणचां कुस्ती संघ व व एक महानगरपालिकेचा कुस्ती संघ असे दोन संघ अमरावती जिल्ह्यातून स्पर्धे करता माननीय ना नितीनजी गडकरी तसेच नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी यांनी खेळण्यासाठी दोन्ही संघांना प्रवेशाची मान्यता दिलेली आहे.
खासदार क्रीडा महोत्सवात अमरावती जिल्ह्यातला ग्रामीण कुस्ती संघाला प्रवेश मिळाल्यामुळे अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण कुस्तीगिरान मध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे. २४ कुश्तीगिरंचा संघ राहिल . आणखी आनंदाची बाब ही होणाऱ्या विदर्भ केसरीमध्ये सुद्धा अमरावती जिल्ह्यातील दोन संघ ग्रामीण कुस्ती संघ आणि एक शहराचा कुस्ती संघांना प्रवेश दिल्या जाईल अशी आश्वासन सुद्धा माननीय रामदाजी तडस विदर्भ कुस्ती संघाचे अध्यक्ष यांनी दिले. मुलींचा संघ कुमार गट पुरुष 3५किलो,४0,४५,५0 महिला कुमार गट 33 किलो 32,४0,४3,४६,४९, पुरुष खुलागट ५3किलो,५७,६१,६५,७0,७४,७५ महिला खुला गट ५0किलो,५3,५५,५७,५९,६2,७६ अशाप्रकारे वजन गट राहील. कुमारगढ़ातिल मुला मुलीचे जन्म 1 जनवरी 200८ नंतरचे इससेया निवड कुस्ती चाचणी स्पर्धेची जबाबदारी मा, अभय माथने अचलपूर ,हेमंत माकोडे अंजनगाव, संजय पवार दर्यापूर, गजानन शंखे दर्यापूर, प्रमोद झगेकर शिरजगाव मोझरी यांना दिलेली आहे अधिक माहिती करता आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच रणवीर सिंग राहाल यांचे संपर्क साधावा.
Comments
Post a Comment