कुष्ठरोग शोध मोहीमची तालुकास्तरीय समन्वय समितीची सभा संपन्न.

 कुष्ठरोग शोध मोहीमची तालुकास्तरीय समन्वय समितीची सभा संपन्न.

-----------------------------------

 रिसोड प्रतिनिधी

 रणजीत सिंह ठाकुर 

-----------------------------------

कारंजा : दिनांक 7 जानेवारी 2025 रोजी पंचायत समिती कारंजा गटविकास अधिकारी राणे मॅडम यांच्या अध्यक्षते खाली कुष्ठरोग शोध मोहीम  2025 (LCDC) तालुकास्तरीय समन्वय समितीची सभा संपन्न झाली. यावेळी गटविकास अधिकारी यांनी सर्व विभाग प्रमुखांना मोहिमेविषयी प्रचार व प्रसिद्धी करण्यासाठी सुचित केले. कुष्ठरोग विषयी  समाजात असलेली भीती व गैरसमज दूर करण्यासाठी जनजागृती करण्यात यावी व समाजामध्ये लपून असलेले जास्तीत जास्त कुष्ठरुग्ण शोधून त्यांना उपचाराखाली आणावे  संसर्गाची साखळी खंडित करावी अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. 

सदर सभेला तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एस.आर.नांदे सदस्य सचिव, श्रीकांत माने सदस्य तथा गटशिक्षणाधिकारी, श्री.मानके साहेब आरोग्य विस्तार अधिकारी, श्री गायकवाड  समूह संघटक, श्री. जाधव कुष्ठरोग तंत्रज्ञ हजर होते. श्री.एम. डी.खरतडे यांनी सदर मोहिमे विषयी सर्वांना मार्गदर्शन केले. सदर मोहीम यशस्वी करण्याच्या विषयावर चर्चा करण्यात आली. गटशिक्षणाधिकारी श्री.माने यांना 30 जानेवारीला सर्व शाळेतील मुख्याध्यापकांना पत्र देऊन मोहिमेविषयीची जनजागृती करिता प्रभात फेरी काढण्याविषयी सूचना देण्यात या. सदर सभा हि पंचायत समिती कारंजा गटविकास अधिकारी यांच्या दालनात संपन्न झाली.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.