रोटेरियन्स चांगले वाहतूक मित सुनील गिड्डे.
रोटेरियन्स चांगले वाहतूक मित सुनील गिड्डे.
------------------------
्मिरज तालुका प्रतिनिधी
राजू कदम
------------------------
मिरज : येथील रोटरी क्लब ऑफ मिरज यांच्या वतीने वाहतूक नियंत्रण शाखा मिरज येथील पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील हौसाबाई देवाप्पा कोळी, पोलीस हेड कॉन्स्टेबल मिलिंद शकुंतला रामचंद्र कुंभार ,पोलीस कॉन्स्टेबल चिमा साहेब राजाक्का धनाजीराव चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल सतीश विमल चंद्रकांत पाटील तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील रंजना महादेव गिड्डे यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल प्रमाणपत्र स्मृतिचिन्ह व तिरंगी हार देऊन रोटरी क्लब ऑफ मिरज चे सचिव डॉक्टर रियाज उमर मुजावर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला .अध्यक्षस्थानी रोटरी क्लब मिरज अध्यक्ष रवींद्र फडके होते. यावेळी सत्काराला उत्तर देताना सुनील गिड्डे म्हणाले की रोटरी क्लबचे सदस्य हे चांगले वाहतूक मित्र आहेत त्यांनी वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी सातत्याने सहकार्य करावे .स्वागत व प्रास्ताविक दंतशल्यचिकित्सक लक्ष्मीकांत घटनट्टी यांनी केले .रोटरी क्लब ची माहिती विजयकुमार कांबळे यांनी दिली.सूत्रसंचालन धनराज सावंत यांनी केले.आभार अभिजीत शिंदे यांनी मानले.
Comments
Post a Comment