खडकेवाडा, ,ता.कागल गांवचे हद्दीत झालेले खुनाचा गुन्हा अवघ्या काही तासातच उघड दोन आरोपींना अटक .
खडकेवाडा, ,ता.कागल गांवचे हद्दीत झालेले खुनाचा गुन्हा अवघ्या काही तासातच उघड दोन आरोपींना अटक .
-------------------------------
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी
शशिकांत कुंभार
-------------------------------
कागल :- एमआयडीसी मध्ये कामाला जातो म्हणून गेलेल्या स्वप्निल अशोक पाटील वय 27 रा. कौलगे ता.कागल जि. कोल्हापूर खडके वाडा रोडवर निर्जन स्थळी खून झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.
नेहमी प्रमाणे स्वप्नील अशोक पाटील कामावर जातो असे सांगून दिनांक 15/01/2025 रोजी सकाळी घरातून बाहेर पडला .
स्वप्नील पाटील कामावरून रात्री परत येताना खडके वाडा येथील निर्जन स्थळी आशुतोष उर्फ छोट्या चंद्रकांत पाटील व व 25 रा.कौलगे व सागर संभाजी चव्हाण व व 34 रा चिखली या दोघांनी डोक्यात दगड घालून खून केला.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की.
दिनांक 15 /01 /2025 रोजी येथील स्वप्नील अशोक पाटील वय वर्ष 27 हा कामाला जातो असे सांगून सकाळी घरातून बाहेर पडला रात्री उशिरापर्यंत मुलगा का परत आला नाही म्हणून अशोक पाटील यांनी शोधाशोध केलीअसता स्वप्निल ठाव ठिकाणा आढळून आला नाही .
स्वप्नील शोध करीत असताना आज दिनांक 17 /01 /2025 रोजी स्वप्निल चा चुलत भाऊ यास खडकेवाडा येथील निर्जन स्थळी स्वप्निल चा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आला.
याची माहिती आपले चुलते अशोक पाटील यांना तात्काळ दिली मृतदेहाची शहानिशा झाल्यावर मृत अशोक पाटील यांनी आपल्या मुलाच्या खून झाल्याची माहिती मुरगुड पोलीस ठाण्यात दिली .
खूनाची माहिती मिळतात पोलीस ठाण्याच्या साह. पोलीस निरीक्षक करे यांनी खून झाल्याची माहिती आपले वरिष्ठ अधिकारी करवीर उपविभागीय पोलीस उपाधीक्षक सुजित कुमार क्षिरसागर व स्थानिक गुन्हे आणि शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना दिली
खूनाची माहिती मिळतात करवीर उपविभागीय पोलिस उप अधीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तात्काळ घटनास्थळी पोचले .
घटनास्थळावर मृतदेहाची पाहणी केल्यावर याची माहिती पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला.
प्रत्यक्षदर्शी पुरावा नसताना मारेकर्याचा याचा शोध सुरू केला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अंमल दार रोहित मर्दाने व विजय इंगळे यांना गोपनीय माहिती मिळाली की स्वप्निल अशोक पाटील व त्याच गावातील आशुतोष पाटील व आणखीन एक जण दिनांक 15/ 01 /2025 रोजी रात्री एकत्र होते त्या माहितीच्या अनुषंगाने आशुतोष पाटील याचा शोध घेऊन त्याला राहत्या घरातून ताब्यात घेतले त्याच्याकडे अधिक तपास केला असता
एक वर्षापूर्वी चुलत बहिणीची स्वप्निल पाटील यांने कळ काढली होती हा राग मनात धरून मित्राच्या साह्याने स्वप्निलच्या डोक्यात दगड घालून खून करून मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली
सदर गुन्हयाचा पुढील तपास मुरगुड पोलीस ठाणेकडील सहा. पोलीस निरीक्षक शिवाजी करे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी . पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडीत ,. अपर पोलीस अधीक्षक, कोल्हापूर, श्रीमती जयश्री देसाई मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी, करवीर विभाग. सुजितकुमार क्षिरसागर , यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अंमलदार रोहित मर्दाने, विजय इंगळे, युवराज पाटील, बालाजी पाटील, राजु कांबळे, समीर कांबळे, यशवंत कुंभार, नामदेव यादव व महादेव कु-हाडे यांनी केली आहे.
Comments
Post a Comment