मठामध्ये राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार.पीडित मुलीचा मोबाईल जप्त;3.आक्षेपार्ह व्हिडिओ आढळले:, जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांच्या पथकाकडून मठ प्रमुखाची चौकशी.
मठामध्ये राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार.पीडित मुलीचा मोबाईल जप्त;3.आक्षेपार्ह व्हिडिओ आढळले:, जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांच्या पथकाकडून मठ प्रमुखाची चौकशी.
---------------------------------------
फ्रंटलाईन् न्युज महाराष्ट्र.
अमरावती.प्रतिनिधी
पी एन देशमुख.
---------------------------------------
अमरावती जिल्ह्यातील शिरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका मठात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर मठप्रमुखासह तिघांनी अत्याचार केला .यामध्ये ती गर्भवती झाल्याने, हे धक्कादायक प्रकरण तीन दिवसांपूर्वी उघड झाले .
दरम्यान याच प्रकरणात काही आक्षेपरीय व्हिडिओ व फोटो पोलिसांना पिढीतेच्या मोबाईल मध्ये आढळले असून .पोलिसांनी तो मोबाईल जप्त केला आहे तसेच या प्रकरणात चौकशीसाठी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी व त्यांचे पथक दी.२१शुक्रवारी मठात पोचले होते.जिल्हा बाल संरक्षण अधिकारी व पथकाने मठात जाऊन पाहणी केली अल्पवयीन मुलीवर ज्या ठिकाणी अत्याचार झालेत की जागा तळघरात आहे या मठात पथक गेले असता त्यावेळी 3, व्यक्ती व एक पुरुष मठात हजर होते तसेच पीडीतीचे आई होती हे सर्वजण १४.फेब्रुवारीपासूनच मठात आल्याचे त्यांनी सांगितले यापूर्वी मठात असलेले सर्व महिला व पुरुष मागील दोन दिवसात त्या ठिकाणी राहून निघून गेले आहे.
मात्र मठात कोण येतो कोण जातो किती दिवस राहतो याबाबत कोणत्याही प्रकारची नोंद नाही किंवा तसे रजिस्टर त्या ठिकाणी नाही याचवेळी पथकाने याचवेळी गावातील सरपंच सचीव व काही नागरिकांची भेट घेतली. तसेच ग्राम संरक्षण समिती सोबत बैठक घेतली गावात ग्राम बालसंरक्षण समितीची स्थापना झाली आहे. या समितीला दरमहा बैठक होणे आवश्यक आहे मात्र समितीने अलीकडे बैठक घेतल्याचे निर्देशनास, आले नसल्याचे बाळ संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले आहे कारण या गावात बैठक झाली असली तर त्यांच्याकडे गावांमध्ये १८ वर्षापेक्षा कमी वयाचे मुले व मुली किती आहेत याबाबत माहिती राहिली असती .मात्र पुढील काळात नियमित बैठक घेऊन गावात संरक्षण करून अल्पवयीन मुले, मुलीची माहिती घेण्याबाबत सूचना दिले असल्याचे बाल संरक्षण अधिकारी अजय डबले यांनी सांगितले आहे दरम्यान अल्पवयीन मुलीवर केलेला अत्याचाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. त्या मठाची धर्मदाय आयुक्तकडे नोंदणी नाही मुलीवर ज्या मठात अत्याचार झाले त्या मठाची धर्मदाय आयुक्तकडे नोंदणीच नसल्याचे जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले आहे पुढील काळात मठात येणाऱ्या जाणाऱ्यांच्या नोंदी ठेवण्याच्या सक्त सूचना देण्यात आले आहे. आक्षेपार्ह व्हिडिओची फ्ररेन्सिक लॅब मध्ये, तपासणी होणार या प्रकरणात आम्ही पिढी तिचा मोबाईल जप्त केला आहे. त्या मोबाईल मध्ये काही आक्षेपरीय व्हिडिओ व फोटो मिळाले आहे त्या व्हिडिओ व फोटोची फॅरेनसिक लॅब मध्ये तपासणी केली जाणार आहे .असे शिर्के पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन लुले यांनी माहिती दिली आहे.
Comments
Post a Comment