नरंदे येथील शर्यतीत विष्णु पाटील बेडग यांची बैलजोडी प्रथम.
नरंदे येथील शर्यतीत विष्णु पाटील बेडग यांची बैलजोडी प्रथम.
-----------------------------------
कुंभोज प्रतिनिधी
विनोद शिंगे
-----------------------------------
नरंदे (ता.हातकणंगले) येथील श्री नागनाथ देवाच्या यात्रेनिमित्त भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन ग्रामपंचायत नरंदे व यात्रा व्यवस्थापन कमिटीच्या वतीने करण्यात आले होते . या शर्यतीचे उद्घाटन माजी खासदार राजू शेट्टी तसेच विद्यमान आमदार अशोकराव माने यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. शासनाच्या सर्व नियम व अटींचे पालन करून ही शर्यत ग्रामपंचायत नरंदे व यात्रा व्यवस्थापन कमिटीच्या वतीने भरविण्यात आली होती. यावेळी हातकणंगले पोलीस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक पवार साहेब, निवासी नायब तहसीलदार संदीप चव्हाण पशुधन अधिकारी माळी पशुवैद्यकिय अधिकारी जाधव भाजपा तालुकाध्यक्ष अमरसिंह पाटील नेर्ली तामगावचे सागर पाटील , गोपनीयचे संग्राम पाटील, तलाठी चौगुले मंडल अधिकारी शेट्टी. सोबत ॲम्बुलन्सची व्यवस्था ही करण्यात आली होती. जनरल बैलगाडी शर्यतीमध्ये प्रथम क्रमांक - विष्णू पाटील बेडग , द्वितीय क्रमांक - बंडा सिध्देवाडी , तृतीय क्रमांक - शेठ बेळंकी, उत्तेजनार्थ - दादू चिंचणी, जनरल बिनदाती बैलगाडी शर्यतीमध्ये प्रथम क्रमांक- अवधूत डुबल धुळगांव , द्वितीय क्रमांक - लक्ष्मण बडेकर बागेवाडी ,तृतीय क्रमांक - आदित्य खरात सलगर उत्तेजनार्थ -बलू वावरे भिलवडी घोडागाडी प्रथम क्रमांक - दत्ता डोंगरे कुर्ली द्वितीय क्रमांक -गेणू आलास, तृतीय क्रमांक - पप्पू बोडके, आष्टा सुट्टा घोडा - प्रथम क्रमांक - खानदेव कोडोली जयसिंगपूर, द्वितीय क्रमांक - मनस्वी पाटील अतिग्रे तृतीय क्रमांक -गोटू माणगांव वाडी
यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती राजकुमार भोसले ,राजाराम कारखान्याचे संचालक सर्जेराव भंडारी, बाळासाहेब भंडारी ,रमेश कुरणे, जगन्नाथ खोत ,तुकाराम अनुसे ,ग्रा.पं.सदस्य ऋषिकेश भोसले ,अमीर मुलाणी ,दत्ता भंडारी , संदीप शेटे सर ,बाल भंडारी ,मधुकर खोत, अरुण भंडारी ,शिवाजी शेटे, रोहीत भंडारी, सागर पाटील ,अमोल शेटे आदी उपस्थित होते.विनोद शिंगे कुंभोज
Comments
Post a Comment