मा रमाई जयंती निमित्त नारी सन्मान सोहळा.
मा रमाई जयंती निमित्त नारी सन्मान सोहळा.
-----------------------------------
रिसोड प्रतिनिधी
रणजीत सिंह ठाकुर
-----------------------------------
वाशिम; वाशीम येथील स्थानिक पंचशील नगर येथे दिनांक १८/०२/२०२५ ला सकाळी १० ते सायं. ६ पर्यंत
भिखु निवास स्थानी या ठिकाणी लोककलावंत सांस्कृतिक मंच मुंबई जिल्हा शाखा वाशिम. तथा रामचंद्र बहुउद्देशीय जनजागृती कला व सांस्कृतिक संस्था सावंगा जहागीर. यांच्या वतीने आयोजित त्यागमूर्ती माता रमाई जयंती व नारी पुरस्कार सन्मान सोहळा आणि नामवंत गायीका गायक यांचा गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, कार्यक्रमाचे उदघाटन पी.रि.पा.चे जिल्हाध्यक्ष मा.दौलत हिवराळे, कार्यक्रमाचे अध्यक्ष संजीवनीताई भालेराव,पोलीस विभाग प्रमुख मार्गदर्शक व प्रमुख पाहुणे महाराष्ट्राचे सूप्रसिद्ध शाहीर विष्णू शिंदे गायक व गितकार संगीतकार मुंबई, डाॅ.सिद्धार्थ देवळे साहेब ह्रदयरोग तज्ञ वाशिम, डाॅ.तुषार गायकवाड वाशिम,
धम्मभुषण प्रतिभाताई सोनोने, अरुणाताई ताजने,कवियत्री मधुराणी बनसोड. लोकशाहीर हरिश्चंद्र फोफळे.वाशिम.लाॅ.बुद्धा चायनाॅल चे गजेंद्र गवई बुलढाणा, डि.आर इंगळे बुलडाणा प्रा.दशरथ खडसे,
चित्रपट निर्माता निवृत्ती सरकटे,सम्दुर शिष्य निरंजन भगत ,प्रसिध्द गायीका विद्याभगत,संजय इंगळे गायक सुकांडा , युवा कलाकार जिल्हा युवा पुरस्कार प्राप्त महाराष्ट्र शासन प्रदिप पट्टेबहादुर,लोककलावंत सांस्कृतिक मंचाचे तालुका तथा जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी ,कार्यक्रमातून ठरावीक काही महिलांना रमाई पुरस्कार देवुन गौरविण्यात येणार असुन आलेल्या सर्व कलावंतास सन्मानपत्र देण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजक मधुकर गायकवाड यांनी या पत्रका मधुन जाहीर केले आहे.
Comments
Post a Comment