महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडास्पर्धेत कोल्हापूर संघाला सर्वसाधारण अजिंक्यपद.
महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडास्पर्धेत कोल्हापूर संघाला सर्वसाधारण अजिंक्यपद.
-------------------------------
बारामती प्रतिनिधी
-------------------------------
*, दि. ९ फेब्रुवारी २०२५:* महावितरणच्या २०२४-२५ च्या राज्यस्तरीय आंतरपरिमंडलीय क्रीडा स्पर्धेत कोल्हापूर परिमंडल संघाने सर्वच क्रीडा प्रकारात दमदार कामगिरी करत सर्वसाधारण अजिंक्यपद पटकावले तर गतविजेत्या पुणे-बारामती संघाला अजिंक्यपदाने थोडक्यात हुलकावणी दिली.
बारामती येथील विद्यानगरीच्या क्रीडा संकुलामध्ये महावितरणच्या चार दिवसीय राज्यस्तरीय स्पर्धेचा समारोप शनिवारी (दि. ८) सायंकाळी थाटामाटात झाला. विजेता व उपविजेत्यांना महावितरणचे संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे व पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कार्यकारी संचालक परेश भागवत, दत्तात्रेय पडळकर, मुख्य अभियंते राजेंद्र पवार, दत्तात्रय बनसोडे, दिलीप दोडके, पवनकुमार कच्छोट, स्वप्नील काटकर, धर्मराज पेठकर, मुख्य समन्वयक तथा मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय ढोके, महाव्यवस्थापक (मासं) राजेंद्र पांडे, मुख्य जनसंपर्क अधिकारी भारत पवार, सहमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी ललित गायकवाड यांचेसह बारामती परिमंडलातील सर्व अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते, विभागप्रमुख व समितीप्रमुखांची उपस्थिती होती.
या प्रसंगी उपस्थित क्रीडा प्रेमींना संबोधित करताना संचालक (प्रकल्प ) प्रसाद रेशमे म्हणाले, बारामतीकरांचे आयोजन आणि नियोजन अतिशय चोख होते. अतिशय शिस्तबद्ध व प्रोफेशनल पद्धतीने ह्या स्पर्धा घेण्यात आल्या. क्रिकेटचे सामने महावितरणमध्ये पहिल्यांदाच लाईव्ह दाखविण्यात आले. महावितरणमध्ये दिवसेंदिवस खेळाचा दर्जा उंचावत आहे. क्रीडा स्पर्धेत हार-जीत होतच असते. परंतु अंतिम विजय हा महावितरणचाच असतो.’
पुणे प्रादेशिक संचालक व आयोजन समितीचे अध्यक्ष भुजंग खंदारे म्हणाले, ‘बारामती येथील स्पर्धा अतिशय चांगल्या वातावरणात पार पडल्या. साधी एक तक्रार सुद्धा नाही हे खिळाडू वृत्ती वाढत असल्याचेच द्योतक आहे. यावर्षी पहिल्यांदाच क्रिकेट व व्हॉलीबॉलचे सामने लिग पद्धतीने खेळवण्यात आले. त्यामुळे प्रत्येक संघाला एकमेकांशी खेळण्याची संधी मिळाली.’
खेळाडुंपैकी, प्रणाली गायकी व सचिन कदम यांनी प्रातिनिधीक मनोगत व्यक्त करत आयोजनाबद्दल प्रशंसा केली. सूत्रसंचलन रोहित राख व मृदुला शिवदे यांनी केले तर मुख्य अभियंता धर्मराज पेठकर यांनी आभार व्यक्त केले.
*सांघिक खेळांचे अंतिम निकाल -* अनुक्रमे विजेता व उपविजेता : क्रिकेट – कोल्हापूर व कल्याण-रत्नागिरी, व्हॉलिबॉल – पुणे-बारामती व कोल्हापूर, कबड्डी (पुरुष)- सांघिक कार्यालय-भांडूप व कल्याण-रत्नागिरी, कबड्डी (महिला)- पुणे-बारामती व सांघिक कार्यालय-भांडूप, खो-खो (पुरुष)- पुणे-बारामती व कोल्हापूर, खो-खो (महिला)- सांघिक कार्यालय-भांडूप व पुणे-बारामती, टेबल टेनिस (पुरुष)- कोल्हापूर व नागपूर-चंद्रपूर-गोंदिया, टेबल टेनिस (महिला)- अकोला-अमरावती व कल्याण-रत्नागिरी, बॅडमिंटन (पुरुष)- नाशिक-जळगाव व कोल्हापूर, बॅडमिंटन (महिला)- पुणे-बारामती व नागपूर-चंद्रपूर-गोंदिया, कॅरम (पुरुष)- नागपूर-चंद्रपूर-गोंदिया व सांघिक कार्यालय-भांडूप, कॅरम (महिला)- नागपूर-चंद्रपूर-गोंदिया व कोल्हापूर, ब्रिज- नाशिक-जळगाव व अकोला-अमरावती, टेनिक्वाईट महिला- कोल्हापूर व नागपूर-चंद्रपूर-गोंदिया.
*वैयक्तिक खेळांचे अंतिम निकाल* (कंसात संघ) -अनुक्रमे विजेते व उपविजेते पुढीलप्रमाणे - १०० मीटर धावणे - पुरुष गट - साईनाथ मसने (सांघिक कार्यालय-भांडूप) व गुलाबसिंग वसावे (पुणे-बारामती), महिला गट – श्वेतांबरी अंबाडे (नागपूर-चंद्रपूर-गोंदिया) व प्रिया झुनघरे, २०० मीटर धावणे - पुरुष गट - गुलाबसिंग वसावे (पुणे-बारामती) व साईनाथ मसने (सांघिक कार्यालय-भांडूप), महिला गट – मेघा जनघरे (कल्याण-रत्नागिरी) व संजना शेजल (पुणे-बारामती), ४०० मीटर धावणे - पुरुष गट – गुलाबसिंग वसावे (पुणे-बारामती) व चंद्रशेखर हुमणे, महिला गट - श्वेतांबरी अंबाडे (नागपूर-चंद्रपूर-गोंदिया) व संपदा कोकरे (कल्याण-रत्नागिरी), ८०० मीटर धावणे - पुरुष गट – परेश चौधरी (नाशिक-जळगाव) व वैभव माने (कोल्हापूर), महिला गट – स्वाती दमाणे (नागपूर-चंद्रपूर-गोंदिया) व संजना शेजल (पुणे-बारामती), १५०० मीटर धावणे - पुरुष गट – सागर सूर्यवंशी (सांघिक कार्यालय-भांडुप) व आबाज पटेल (नाशिक-जळगाव), महिला गट- रागिनी बेले (नागपूर-चंद्रपूर-गोंदिया) व अर्चना भोंग (पुणे-बारामती), ५००० मीटर धावणे - पुरुष – सुनिल कोकणे (कल्याण-रत्नागिरी) व एकनाथ घंगाळे (नाशिक-जळगाव), ४ बाय १०० रिले - पुरुष गट - प्रतीक वाईकर, गुलाबसिंग वसावे, अक्षय केंगाळे, सोमनाथ कांतीकर (पुणे-बारामती) व प्रदीप वंजारे, शुभम निंबाळकर, अथर्व कोळी, वैभव माने (कोल्हापूर) व महिला गट - श्वेतांबरी अंबाडे, वेदवी सोनवणे, स्वाती दमाणे, संगीता पुंदे (नागपूर-चंद्रपूर-गोंदिया) व सोनिया मिठबावकर, सारिका जाधव, सोनाली मोरे, रिता तायडे (सांघिक कार्यालय-भांडूप)
गोळा फेक - पुरुष गट - प्रवीण बोरावके (पुणे-बारामती) व इम्रान मुजावर (कोल्हापूर), महिला गट – प्रियंका शेळके (नाशिक-जळगाव) व पूजा ऐनापुरे (कोल्हापूर), थाळी फेक - पुरुष गट - धर्मेद्र पाटील (नाशिक-जळगाव) व संदेश मोहिते (सांघिक कार्यालय-भांडुप), महिला गट- ज्योती कांबळे (कोल्हापूर) व प्रियंका शेळके (नाशिक-जळगाव), भाला फेक - पुरुष गट – अमित पाटील (कोल्हापूर) व मिलींद डफळे (कल्याण-रत्नागिरी), महिला गट - अश्विनी जाधव (कोल्हापूर) व हर्षदा मोरे (कल्याण-रत्नागिरी), लांब उडी - पुरुष गट – अक्षय केंगाळे (पुणे-बारामती) व अमित हुमणे (कल्याण-रत्नागिरी), महिला गट - मेघा जुनघरे (कल्याण-रत्नागिरी) व माया येळवंडे (पुणे-बारामती), उंच उडी - पुरुष गट – सतीश पाटील (कोल्हापूर) व जाकीर शेख (छ.संभाजीनगर-नांदेड-लातूर), महिला गट - सोनाली मोरे (सांघिक कार्यालय-भांडूप) व अश्विनी देसाई (कोल्हापूर), बुद्धिबळ- पुरुष गट – निलेश बनकर (नागपूर-चंद्रपूर-गोंदिया) व अमोल वराडे (नाशिक-जळगाव), महिला गट - रंजना तिवारी (कल्याण-रत्नागिरी) व अमृता जोशी (सांघिक कार्यालय-भांडुप), कॅरम - पुरुष गट – अनिकेत भैसाने (नागपूर-चंद्रपूर-गोंदिया) व अनंत गायत्री (सांघिक कार्यालय-भांडुप), महिला गट - पुष्पलता हेडाऊ (नागपूर-चंद्रपूर-गोंदिया) व विजया माळी (कोल्हापूर), टेनिक्वाईट - महिला एकेरी – कविता कांबळे (छ.संभाजीनगर-नांदेड-लातूर) व लिना पाटील (कल्याण-रत्नागिरी), महिला दुहेरी – मंजुषा माने, पूजा ऐनापूरे (कोल्हापूर) व शीतल नाईक- कोमल सुरवसे (पुणे-बारामती), टेबल टेनिस - पुरुष एकेरी – अतुल दंडवते (कोल्हापूर) व रितेश सव्वालाखे (नागपूर-चंद्रपूर-गोंदिया), पुरुष दुहेरी – किरणकुमार पवार – रोहन श्रीरामवार (छ.संभाजीनगर-नांदेड-लातूर) व रितेश सव्वालाखे - प्रमोद मेश्राम (नागपूर-चंद्रपूर-गोंदिया), महिला एकेरी - स्नेहल बढे (अकोला-अमरावती) व रंजना तिवारी (कल्याण-रत्नागिरी), महिला दुहेरी- स्नेहल बढे-कोमल पुरोहित (अकोला-अमरावती) व प्राची ठाकरे-सायली कांबळे (सांघिक कार्यालय-भांडूप), बॅडमिंटन - पुरुष एकेरी – भरत वशिष्ठ (पुणे-बारामती) व पंकज पाठक (छ.संभाजीनगर-नांदेड-लातूर), पुरुष दुहेरी - भरत वशिष्ठ-सुरेश जाधव (पुणे-बारामती) व पंकज पाठक- दिपक नाईकवडे (छ. संभाजीनगर-नांदेड-लातूर) व, महिला एकेरी - वैष्णवी गांगारकर (पुणे-बारामती) व राणी पानसरे (सांघिक कार्यालय-भांडुप), महिला दुहेरी – वैष्णवी गांगारकर - अनिता कुलकर्णी (पुणे-बारामती) व विदुला पाटील-चैत्रा पै (कोल्हापूर), कुस्ती - ५७ किलो – आत्माराम मुंढे (पुणे-बारामती) व संभाजी जाधव (कोल्हापूर), ६१ किलो - विनोद गायकवाड (अकोला-अमरावती) व शरद मोकळे (छ. संभाजीनगर-नांदेड-लातूर), ६५ किलो - राजकुमार काळे (पुणे-बारामती) व सूर्यकांत गायकवाड (नाशिक-जळगाव), ७० किलो – अनंत नागरगोजे (सांघिक कार्यालय-भांडुप) व युवराज निकम (कोल्हापूर), ७४ किलो -गुरुप्रसाद देसाई (कोल्हापूर) व जयकुमार तेलगावकर (छ. संभाजीनगर-नांदेड-लातूर), ७९ किलो – अकिल मुजावर (पुणे-बारामती) व ज्योतीबा ओंकार (कोल्हापूर), ८६ किलो – महावीर जाधव (पुणे-बारामती) व बलराज आळणे (छ. संभाजीनगर, नांदेड-लातूर), ९२ किलो – अमोल गवळी (पुणे-बारामती) व तुषार वारके (कोल्हापूर), ९७ किलो – महेश कोळी (पुणे-बारामती) व हनुमंत कदम (कोल्हापूर) आणि १२५ किलो – प्रमोद ढेरे (कोल्हापूर) व वैभव पवार (पुणे-बारामती), ब्रिज- पंकज आखाडे-प्रतिक शहा (नाशिक-जळगाव) व अभिषेक बारापहे-विजय पवार (कोल्हापूर), शरीर सौष्ठव - ६५ किलो – सुनिल सावंत (कल्याण-रत्नागिरी) विशाल मोहोळ (पुणे-बारामती), ७० किलो – अमित पाटील (कोल्हापूर) व मोहम्मद शेख (अकोला-अमरावती) ७५ किलो – प्रवीण झुनके (कोल्हापूर) व नामदेव शिंदे (नाशिक-जळगाव), ८० किलो – राहूल कांबळे (कोल्हापूर) व दिनेश दहाडे (नाशिक-जळगाव), ९० किलो – अपूर्व शिर्के (कल्याण-रत्नागिरी) व गौरव पोवार (कोल्हापूर) ९० किलो+ - सलमान मुंडे (कोल्हापूर) व नागेश चौगुले (कोल्हापूर), पॉवर लिफ्टींग – ५९ किलो रवी मिरगणे (छ.संभाजीनगर-नांदेड-लातूर) व दिपक गांगुर्डे (नाशिक जळगाव), ६६ किलो - ताजेश आबाळे (अकोला-अमरावती) व राजेंद्र राठोड (छ. संभाजीनगर-नांदेड-लातूर), ७४ किलो- मनिष कोंद्रा (पुणे-बारामती) व सागर जगताप (कोल्हापूर), ८३ किलो- स्वप्नील निमसरकार (सांघिक कार्यालय-भांडुप) व प्रवीण घुनके (कोल्हापूर), ९३ किलो- प्रवीण तायडे (अकोला-अमरावती) व महेश इंगोले (नागपूर-चंद्रपूर-गोंदिया), १०५ किलो- श्रीकृष्ण इंगोले (नागपूर-चंद्रपूर-गोंदिया) व नागेश चौगुले (कोल्हापूर).
*सोबत* - कोल्हापूर संघाला सर्वसाधारण अजिंक्यपदाचा चषक प्रदान करतानाचा फोटो
Comments
Post a Comment